शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. ७० रुपयांच्या सोयाबीन तेलाची ११० रु. भावाने खरेदी! वर्धेतील दिव्यांग प्रशिक्षण संस्थेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:47 IST

राज्यात एकमेव असलेल्या वर्धेतील दिव्यांगांच्या प्रशिक्षण संस्थेत सोयाबीनचे तेल ११० रुपये किलो दराने खरेदी झाले आहे.

ठळक मुद्देराज्यातील एकमेव संस्था

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्यात एकमेव असलेल्या वर्धेतील दिव्यांगांच्या प्रशिक्षण संस्थेत सोयाबीनचे तेल ११० रुपये किलो दराने खरेदी झाले आहे. बाजारात आतापर्यंत कधीच ११० रुपये किलोने सोयाबीन तेल विकल्या गेले नाही. यातही होणारी खरेदी ठोक दरात असल्याने हे दर कमी असणे अपेक्षित असताना, येथे हा प्रकार घडला आहे.दिव्यांगांना औद्योगिक शिक्षण देऊन सक्षम बनविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून ही अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. वर्धेतील ही संस्था राज्यात एकमेव असून विविध समस्यांनी तिला ग्रासले आहे. असे असताना ही संस्था समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचा बळी ठरत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.संस्थेत केवळ आठ विद्यार्थी असून त्यांच्यावर महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. हा खर्च विद्यार्थ्यांवर होत असला तर वावगे नाही, पण यातून अधिकाऱ्यांचेच चांगभले होत असेल तर शासनाच्या उद्देशाला येथे हरताळ फासल्या जात असल्याचे दिसते.किराणा खरेदी वर्धेतून नाही तर नागपुरातून ठोक स्वरूपात झाली आहे. यामुळे किराण्याचे दर कमी असणे अपेक्षित असताना यादीत असलेले दर अनेकांच्या भुवया उंवाविण्यास पुरेसे आहेत. लावलेले दर आणि वजनाचा विचार केल्यास हा किराणा खरच विद्यार्थ्यांकरिता खरेदी केला की अन्य कोणत्या कारणाकरिता हे समजणे विचाराच्या पलिकडचे आहे. आठ विद्यार्थ्यांकरिता १५ किलो शेंगदाणे हे गणित कसे हे कोणालाही कळणार नाही. केवळ किराणाच नाही इतर साहित्याच्या खरेदीतही संशय निर्माण होत आहे.

स्वीपर खराटा ६० रुपयेघरी पाणी काढण्याकरिता आणि झाडझूड करण्याकरिता असलेला स्वीपर खराटा २० रुपयांत मिळतो. बाजारात ही किंमत असताना येथे या खराट्याची किंमत एक नग ६० रुपये एवढी लावण्यात आली आहे. एवढेच नाही तर इतर साहित्याच्या दराबाबतही संशय निर्माण होत आहे.

आठ विद्यार्थ्यांकरिता २२ हजारांचा किराणासंस्थेत अधीक्षक आणि अधिकाºयांच्या संगनमताने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आठ विद्यार्थ्यांकरिता तब्बल २१ हजार ८६६ रुपयांचा किराणा आणला आहे. यातून विद्यार्थ्यांना नेमके काय दिले, हा संशोधनाचा विषय आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ठरवून देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून किराणा घेण्यात येत आहे. यात कुठलीही गडबड झालेली नाही. होत असलेला खर्च आणि झालेली खरेदी नियमात आहे. केंद्रातील विद्यार्थ्यांची संख्या कमीअधिक होत असते. यामुळे खर्च कमी-जास्त होतो.- पी.आर. नागोडे, अधीक्षक, अपंग प्रशिक्षण संस्था, वर्धा.

टॅग्स :Crimeगुन्हा