शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळी स्वयंपाकाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:59 IST

१ डिसेंबरपासून शासकीय नियमांचे पालन करीत दिवसाला केवळ ५० पुरणपोळी स्वयंपाक सुरु करण्याचा निर्णय आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे मंदिर संस्थानने घेतला आहे.

ठळक मुद्दे १५ दिवसांपूर्वी करावी लागणार नोंदणीदिवसाला केवळ ५० स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांपासून आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे मंदिर दर्शनासाठी आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून महाराजांचे समाधी दर्शन सुरु करण्यात आले आहे. मात्र, भाविकांची पुरणपोळीची ओढ आणि आतुरता बघता १ डिसेंबरपासून शासकीय नियमांचे पालन करीत दिवसाला केवळ ५० पुरणपोळी स्वयंपाक सुरु करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र हे येथील पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. रविवारी आणि बुधवारी संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक भक्त आजनसरा येथे पुरणपोळीचा स्वयंपाक घेवून येतात. मात्र, कोविडचा कहर बघता मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मागील आठवड्यात समाधी दर्शन सुरु केले आहे. मात्र, भाविकांची स्वयंपाकाची ओढ बघता दिवसाला केवळ ५० स्वयंपाकालाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच एका स्वयंपाकावर फक्त ५० लोकांनाच प्रवेश असणार आहे.१५ दिवसांपूर्वी करावी लागणार नोंदणीपुरणपोळीचा स्वयंपाक ठेवण्यासाठी १५ दिवसांपूर्वी देवस्थानच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता येणाऱ्या स्वयंपाकांना मंदिरपरिसरात प्रवेश दिला जाणार नाही. संस्थांनकडून निर्गमित झालेल्या नियमांचे पालन करुन भोजाजी महाराज संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी केले आहे.ज्येष्ठांना प्रवेशबंदस्वयंपकास्थळी प्रसाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहणार आहे. दहा वर्षांआतील मुले, ज्येष्ठनागरिक तसेच गर्भवती महिलांना स्वयंपाकस्थळी प्रवेशबंदी राहणार आहे. भाविकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Templeमंदिर