शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:48 IST

शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या काही विहिरी जमीनदोस्त : काहींचा कचरा टाकण्यासाठी होतोय वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी, कोट्यवधी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पुलगाव बॅरेज आदी सर्व कार्यान्वित असल्या तरीही नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर वर्धा निम्न वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शहरात असणाºया जुन्या मोठ्या विहिरी भर उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागवित होत्या. परंतु, मागील काही वर्षांत शहरातील काही मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या, तर काही विहिरींचा उपयोग शहरवासीयांनी केरकचरा टाकण्यासाठी केला.साधारणत: मे, जून महिन्यात शहरात पाणी समस्या निर्माण होत असे. त्यावर उपाय म्हणून नगर प्रशासनाने शहरातील हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, बरांडा येथील मोठ्या विहिरींवर मोटारपंप बसवून शहरात टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करीत असे, परंतु मागील काही वर्षात दयालनगर, आठवडी बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगतच्या विहिरी जमीनदोस्त केल्या. तर हरिरामनगर व गणेशनगर येथील विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.रखरखते उन्ह व धरणातील पाण्याची पातळी पाहता वर्धा माई कोरडी झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरात असणाºया हापंपवर पहाटेपासून आई-बहिणी गर्दी करीत आहेत. खासगी विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे.पाणी समस्या सुटावी म्हणून वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज बांधण्यात येत आहे. हे काम मे २०१० मध्ये सुरू झाले असून अद्याप पूर्ण झाले नाही. उलट ९५ कोटी खर्चाचे बांधकाम ३०० कोटींवर पोहोचले तरी शहरवासी भर उन्हातही तहानलेलेच आहे. दोन वेळ पाणीपुरवठ्याचे बील घेणाºया नगर प्रशासनाचे शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई