शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रास्तारोकोतून हाथरसच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:00 AM

रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : पाऊण तास रोखला नागपूर-अमरावती महामार्ग, आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेला प्रकार निंदनिय असून पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना वाटेत अडविण्यात आले. या दोन्ही घटनांचा निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने रविवारी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महार्गावरील टि-पॉर्इंटवर एकत्र येण्यास सुरूवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन रस्त्यावर टायर जाळले. शिवाय केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती.आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तर काही वेळानंतर आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सचिन वैद्य, विजय सोनटक्के, अंगद गिरिधर, अक्षय राठोड, विशाल बोके, रज्जाक अली, सुबोध गोंडसे, सुरज मुंदरे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.तासभरानंतर सुरळीत झाली वाहतूकआंदोलनकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन टायर जाळल्याने नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून जळत्या टायर विझवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तासानंतर सुरळीत केली.केंद्राच्या कृषी विधेयकास दर्शविला विरोधराष्ट्रीय महामार्गावरील टि-पॉर्इंटवर रस्तारोको आंदोलन करणाºया आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी विषयक विधेयकाचाही विरोध केला. शिवाय हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने ते तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी रेटली.आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून ६८ प्रमाणे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवाय काही वेळानंतर त्यांनी सुटका करण्यात आली आहे.- रवी राठोड, ठाणेदार, पोलीस स्टेशन तळेगाव (श्या.पंत.).हाथरस येथे घडलेला प्रकार, तेथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेत्यांना वाटेत अडविण्यात आले तसेच केंद्र सरकारचे कृषी विधेयक या प्रमुख मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. केंद्र व उत्तरप्रदेशातील योगी सरकार दडपशाहीचा अवलंब करीत असून त्याचा निषेध आम्ही केला.- सचिन वैद्य, जिल्हा समन्वयक, युवा काँग्रेस.

टॅग्स :Strikeसंप