वर्धा : ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या घरांची घरपट्टी आतापर्यंत जागेनुसार ठरविल्या जात होती. शासनाने आता नवीन निर्णय घेतला असून ही घरपट्टी घराच्या किमतीनुसार ठरणार आहे. यामुळे घरपट्टीत सहा ते आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे. याचा भुर्दंड नागरिकांवर बसणार आहे. काही वर्षांपूर्वी घरपट्टीची आकारणीही घरांच्या अंदाजे किमतीनुसार ठरविली जायची. मात्र १९९५ पासून प्रतिचौरस फुटांच्या आकाराने संपूर्ण घरावर कर आकारत असत. घरमालकाने बांधकामावेळी अर्ज करताना तो आकार नमूद केलेला होता. ग्रामसभेला अधिकार देऊन दर चार वर्षांनी घरपट्टी किरकोळ वाढण्याची अट होती. या नियमानुसार ग्रामपंचायतीची घरपट्टी आकारणी आकारत त्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीनंतर राज्याने सुधारित घरपट्टी आकारणी नियम लागू केला आहे.या नवीन अधिसूचनेनुसार इमारतीच्या भांडवली मुल्यांवर आधारित घरपट्टीचे दर ठरविण्यात येईल. यात कमाल आणि किमान दर निश्चित केले असून भाडेतत्त्वावर ज्या घरांचा वापर होत असेल त्यांना स्वतंत्र कर आकारणी शंभर रुपये भांडवली मुल्यांवर २० ते ३० पैसे, भाडेतत्वावरील इमारतीसाठी वार्षिक भाडे मुल्याच्या ३ ते ४ टक्के, दगड व विटांची पक्के घर असल्यास शंभर रुपयांच्या भांडवली मुल्यावर ५० पैसे घरपट्टी व भाड्याच्या इमारतीला १२ ते १५ टक्के नवीन, आरसीसीसाठी शंभर रुपये भांडवली खर्चाच्या ७५ पैसे ते एक रुपयांपर्यंत तसेच भाड्यासाठी वार्षिक भाडे मुल्याच्या २० ते २५ टक्के घरपट्टी राहणार आहे. आतापर्यंत घरपट्टीची आकारणी ही भौगोलिक परिस्थिती सर्वसाधारण भागातील ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिकालगतच्या किंवा तीन हजारहून अधिक लोकसंख्यची ग्रामपंचायती अशी केली जात. डोंगराळ भागासाठी कमी दर आकारले जात असे. या नवीन निर्णयानुसार यापूर्वी एक हजार घरपट्टी असलेल्यांना ७ ते ८ हजार रुपये भरावे लागतील. जसे स्लॅबचे घर असल्यास किमान ७ हजार ५०० रूपये वार्षिक घरपट्टी आकारली जाईल.(प्रतिनिधी)
जागेवर नाही तर किमतींवर ठरणार घरपट्टी
By admin | Updated: October 5, 2015 02:20 IST