शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

ढोल-ताशांच्या गजरात रंगतोय प्रचाराचा फड

By admin | Updated: November 18, 2016 02:17 IST

नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. मतदानाचा दिनांक दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने

मनधरणीला वेग : आश्वासनांच्या पावसात नाहतोय मतदारप्रशांत हेलोंडे वर्धानगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. मतदानाचा दिनांक दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. सध्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहरातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. या रॅल्यांमध्ये ढोल- ताशांचा गजर होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि अपक्षांकडूनही रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या या फैरींमुळे शहरातील वातावरण ढवळून निघत आहे. वर्धा नगर परिषदेच्या नराध्यक्ष पदाकरिता १४ उमेदवार रिंगणात दंड थोपटून आहेत. यात राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भाजपकडून अतुल तराळे, काँगे्रसकडून प्रवीण हिवरे, राष्ट्रवादी काँगे्रसचे चंद्रशेखर खडसे, शिवसेनेचे राजेश सराफ, आम आदमी पार्टीचे रवींद्र साहू, बहुजन समाज पार्टीचे गणेश जवादे, रिपाइंचे अशोक मेश्राम यांच्यासह अपक्ष सुधीर पांगुळ, नरेंद्र गुजर, मोहन चौधरी, सुरेश ठाकरे, तुषार देवढे, आशिष पुरोहित, सुरेश रंगारी हे सर्वच उमेदवार प्रचाराची शिकस्त करीत आहेत. यात राजकीय पक्षांसह अपक्षांच्या प्रचाराचे फडही चांगलेच गाजत आहेत. प्रचाराच्या विविध पद्धती उमेदवारांकडून शोधून काढण्यात आल्या आहेत. सर्वाधिक प्रचार वाहने, सायकल रिक्षांवर भोंगे वाजवून केला जात आहे. यात देशभक्तीपर गीतांसह सिनेमाच्या गीतांचे बोल कानी पडत आहेत. मतदारांना हा मोठ्या आवाजातील प्रचार ‘बोअर’ होऊ नये म्हणून विविध गीतांचा वापर केला जात आहे. यात शिवसेनेचे ‘सैराट’वर आधारीत गाणे, तर आप उमेदवाराची वेगळी शैली आणि काँग्रेसचे एलईडी असलेले वाहन मतदारांचे लक्ष वेधत आहे. काहींनी उमेदवारांवरच गीत बसविले आहे. सिनेमाच्या गीतांच्या चालीवर उमेदवारांची गाणी मतदारांच्या कानी पडत आहेत. ही प्रचार शैली बहुतांश उमेदवारांनी आत्मसात केली असून काहींनी यातून आपली मते मांडण्याचा प्रयत्नही चालविल्याचे दिसून येत आहे. अमक्या उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत असल्याचे दिसते. कुणी आपला माणूस म्हणून प्रचार करताना दिसतो तर कुणी एक संधी मागत आहे. कुणी पक्षाने कसे डावलले हे सांगत मतदारांना आळवणी करीत आहे तर कुणी पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून शहर विकास साधण्याचे स्वप्न मतदारांना दाखवित आहे. सध्या सर्वच उमेदवारांकडून रॅलींवर भर दिला जात आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी एक दिवस एका भागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागात रॅली काढली जात आहे. या रॅलीमध्ये सर्वात समोर ढोल-ताशाचे पथक दिसून येत आहे. या पथकाद्वारे विविध ताल वाजवित मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ढोल-ताशाचे सूर कानी पडताच मतदार आपोआपच घराबाहेर निघतात. मग, उमेदवार आणि सोबतची नेते मंडळीही त्यांना हसतमुखाने नमस्कार घेत असल्याचे दिसून येत आहे. रॅलीमधील ढोल-ताशाचे पथक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पूर्वी मोर्चा रॅलीमध्ये ढोल-ताशा, बँड दिसून येत नव्हते; पण आता त्यालाच अधिक महत्त्व आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकच रॅलीमध्ये बँडबाजाच्या माध्यमातून मतदारांना घराबाहेर निघण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. रिंगणात दंड थोपटून असलेला प्रत्येकच उमेदवार व त्यांच्या नेते मंडळीकडून विविध आश्वासने दिली जात आहे. शहराचा विकास करण्यासह मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची ग्वाहीदेखील दिली जात आहे. निवडणूक काळात मतदार राजा आश्वासनांच्या पावसात न्हाऊन निघत असल्याचेच पाहावयास मिळत आहे.