शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तूर, चण्यावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:44 IST

तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही.

ठळक मुद्देफवारणीच्या खर्चाने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही. त्यामुळे तुर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यावर्र्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना मात्र शेतातील पिकांवर अनेक रोगांनी आक्रमण केल्याने शेतकरी महागडे किटकनाशक औषध फवारणी करून थकले आहे. फवारणीच्या नादात शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती फारच चिंताग्रस्त आहे. नगदी समजले जाणाऱ्या सोयाबीन पिकाला उतारीच नसल्याने सोयाबीन फारच कमी प्रमाणात पिकले. अनेक शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन पोत्याच्या उत्पादनात समाधान मानावे लागले. त्यामुळे सोयाबीन पेरणीचा खर्च, खत व फवारणी, काढणीचाही खर्च निघाला नाही. नंतर कपाशी पिकावर सर्व शेतकऱ्यांची भिस्त असतांना मात्र या भागात जिल्ह्यात प्रथमच निजामपुर येथील भांगे यांच्या शेतात बोंडअळी आढळल्याने शेतकरी पुरता धास्तावलेला होता. सुरवातीलाच बोंडअळी कपाशी पिकावर आढळल्याने नागपूरपासुन तर जिल्हयातील कृषी विभाग बोंड अळीवर मात करण्यासाठी कामी लागला. योग्य मार्गदर्शनामुळे या भागातील बोंडअळीचे प्रमाण कमी करता आले.नंतर एका महिन्यातच कपाशीवर चुरडा रोगाचे आक्रमण झाले. यातुन कपाशीची परिस्थिती थोडीफार सुधारली असतांना मात्र ऐन कपाशी वेचण्याच्या हंगामातच कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. सुरवातीपासुनच कपाशीवर महागडे विविध प्रकारचे किटकनाशक फवारून शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोसळले आहे. त्यातच कपाशीच्याही पिकात घट येणार असल्याचे संकेत मिळत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनात आर्वी कृषि विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी