‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:57 PM2018-02-17T23:57:14+5:302018-02-17T23:57:36+5:30

Prohibition of 'that' event | ‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध

‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दोषीवर कठोर कारवाईची मागणी

ऑनलाईन लोकमत
वर्धा : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर शहरातील उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या घटनेचे पडसाद वर्धेत शनिवारी उमटले. सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शुक्रवार १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंद्रम यांनी महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान व समस्त विश्वाचे आदरस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत असे वक्तव्य करणे ही बाब निंदनिय असून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंद्रम याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात मराठा सेवा संघसह विविध संघटनांनी केली आहे. निवेदन देताना मराठा सेवा संघाचे अमर देशमुख, सुधीर गिºहे, राजू किटे, अरुण येवले, मयुर डफळे, महेश गायकवाड, प्रशांत रोकडे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, विवेक तळवेकर, सचिन हजारे, प्रितेश चोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, वंदना गावंडे, बुटे, शंतनु भोयर, अमोल वांदिले, कुणाल बहादुरे, अमोल थोटे, हर्षल सोनटक्के, धीरज चव्हाण, आशीष वासनिक, संभाजी ब्रिगेडचे मंगेश विधळे, अतुल शेंदरे, सुरज धायवट, मनोज गायकवाड, मंगेश गांडोळे, अशोक बेले, जय मल्हार संघटनेचे विक्की हातागळे आदींची उपस्थिती होती.
पुलगावात बसपाकडून ठाणेदारांना निवेदन
पुलगांवचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांना बसपाच्यावतीने निवेदन देऊन आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अहमदनगर येथील उपमहापौर श्रीपाद छिन्गम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना राजू लोहकरे, शेख नाजिम, विनोद बोरकर, अंकुश मसने, सोनु मेंढे, शेख एजाज, शेख फिरोज, जयवंत मिश्रा, ईश्वर ठोंबरे, धर्मपाल गायकवाड, रमेश मानकर, नितिन परुळकर, पवन कोटांगले, मंगेश धांडे, राजेश व्यास, श्यामसुंदर देशमुख, स्वप्निल लोनकर आदींची उपस्थिती होती. यावेळी निवेदनकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदविला.

Web Title: Prohibition of 'that' event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.