शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:15 IST

कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्दे दोषींवर कारवाईची मागणी : वर्धेसह जिल्हाभर उमटले पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.वर्धा शहरात आंबेडकरी जनतेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी कोरेगाव भीमा येथील घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करून संबंधितांवर भादंविच्या ३०२ कलम व पूर्व नियोजित हत्येचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल करावा. शिवाय आरोपीवर अ‍ॅक्ट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य विजय आगलावे, निरज गुजर, शारदा झामरे, अ‍ॅड. हर्षवर्धन गोडघाटे, अतुल दिवे, मयुर डफळे, विशाल रामटेके आदींची उपस्थिती होती.बसपाच्यावतीने निवेदनबहूजन समाज पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात कोरेगाव भीमा येथील दगडफेक, जाळपोळ व भीमसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आहे. तसेच दोषींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनोमदर्शी भैसारे, भास्कर राऊत, मेजर विजय ढोबळे, ओमप्रकाश भालेराव, दीपक भगत, मनिष फुसाटे, सुरेश नगराळे, दिनेश वाणी, पुरुषोत्तम लोहकरे, जयंत वासनीक, विवेक गवळी, शालिक गवळी, अ‍ॅड. अभिषेक रामटेके, धम्मा तेलंग, अजय मुन, वसंत डंभारे, सचिन शंभरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव