शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पाच एकरात २०० क्विंटल मिरचीचे उत्पादन

By admin | Updated: October 28, 2014 23:02 IST

जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर माणसाने प्रगतीचे शिखर गाठले. याचाच प्रत्यय बोटोणा येथील शेतकरी राजू जोरे यांनी दिला़ उंच भागावरील ‘रेड झोन’ परिसरातील १६ एकर खडकाळ व मुरूमाट शेती

अमोल सोटे - आष्टी (श़)जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर माणसाने प्रगतीचे शिखर गाठले. याचाच प्रत्यय बोटोणा येथील शेतकरी राजू जोरे यांनी दिला़ उंच भागावरील ‘रेड झोन’ परिसरातील १६ एकर खडकाळ व मुरूमाट शेती सुपिक करून ठिबक सिंचनाद्वारे विविध पिकांतून सरासरी ओलांडून दुप्पट उत्पन्न त्यांनी घेतले. यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचेही शेताला भेट दिल्यावर सहज लक्षात येते़ या शेतीतून त्यांनी शेतकऱ्यांना आदर्शच घालून दिला आहे़ आष्टी व कारंजा (घा़) तालुक्याच्या सिमेवर असलेल्या बोटोणा गावात दरवर्षी पाण्याचा दुष्काळ असतो़ पावसाच्या पाण्यावर खरीप पीक घेऊन शेतकरी मोकळे होतात. या विपरित परिस्थितीत राजू जोरे यांनी शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्याकडे १६ एकर खडकाळ व मुरमाट शेतजमीन आहे. या शेतात रासायनिक खत देऊन उत्पन्न क्षमता वाढविली. पिकांचे सिंचन व्हावे म्हणून विहीर खूप खोलवर खोदली. विहिरीबाहेर पाणी शुद्ध करण्याचे फिल्टर बसविले. त्याच्या काठावर व्हेंचिरी व मेनीफोल्ट बसविले. सर्व पिकांचे नियोजन करून ५ एकर मिरची, ३०० संत्रा व ७० मोसंबी झाडे या दोन्हीच्या मधोमध टमाटरचे आंतरपिक घेतले़ ८ एकरात कपाशीची लागवड केली. सर्व पिकांना ठराविक अंतर सोडून तार व स्प्रिंगच्या साह्याने संरक्षित केले. प्रत्येक दहा फुटावर खांब जमिनीत गाडले. शेताचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून सौर ऊर्जेवरील तारेचे कुंपण केले़ शेतात दररोज सकाळपासून स्वत: राबणे, मजुरांकडून काम करून घेणे व निंदण वेळेवर करणे सुरू केले. याचा फायदा उत्पन्नात झाला. गतवर्षी एकरी २४ क्विंटल कापूस झाला़ यंदा मिरचीवर रोग आल्याने उत्पन्नात घट आली; पण जोरे यांची मिरची चांगली बहरली़ ५ एकरात २०० क्विंटलचे उत्पादन हाती आले असून अवघ्या ३ तोडाईमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले़ शेतातील दर्जेदार नियोजन पाहून रेड झोनमध्ये अशी शेती होऊ शकते, यावर कुणाचा विश्वास बसत नाही. मेहनत व परिश्रमाच्या आधारावर सर्व शक्य आहे, असाच विश्वास जोरे व्यक्त करतात़ शेतकऱ्यांनी बदलत्या काळासोबत चालल्यास फायदा नक्कीच होतो, हेच या शेतीतून त्यांनी दाखवून दिले़