शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

पांदण रस्त्याची समस्या निकाली निघणार

By admin | Published: April 19, 2017 12:45 AM

जिल्ह्याला सी.एस.आर. निधीमधून दोन जे.सी.बी. यंत्र प्राप्त झाले आहे.

आमदारांचा पाठपुरावा : जलसंधारणाची कामेही होणार हिंगणघाट : जिल्ह्याला सी.एस.आर. निधीमधून दोन जे.सी.बी. यंत्र प्राप्त झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाची कामेही होणार आहे. पांदण रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी पांदण रस्ता महत्त्वाचा आहे. परंतु, पांदण रस्ता बांधकामाकरिता मुबलक निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बहुतांश पांदण रस्त्यांना झुडपांसह अतिक्रमणाचा वेडा आहे. पांदण रस्त्याची कामे व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तटपुज्या निधीत ही कामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आ. कुणावार यांनी पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे प्रस्ताव सादर केला. त्यात जिल्ह्यात किमान दोन जेसीबी मशीन दिल्यास त्याद्वारे पांदण रस्त्याची समस्या निकाली निघेल व जलसंधारणाची कामे सुद्धा होतील, अशा आशयाचा मजकुर होता. आ. कुणावार यांचा प्रस्ताव ना. मुनगंटीवार यांनी तातडीने मान्य करीत सी.एस.आर. निधीमधून दोन जेसीबी मशीन जिल्ह्याकरिता दिल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिलीच बाब आहे असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर सोपविण्यात आली असून पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त व मोकळे करणे, त्यानंतर जलसंधारणाची व इतर कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्धा यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले. त्या अनुषंगाने सोमवार दि. १७ एप्रिल पासून हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथून पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन यादव, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, सरपंच प्रशांत घवघवे, ग्रा.पं. सदस्य प्रवीण फटींग, गिरधर चिडाम, प्रभाकर कांबळे, नाना ढगे, रवी टापरे, किशोर भागडे, तुराणे, दिवाकर वावरे, नारायण भिसे, संदीप झाडे, विठ्ठल गुजरकर, सुधाकर खैरे, प्रभाकर उगेमुगे, अमोल महाकाळकर, जनार्धन काचोरे, वाटकर, विळुरकर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)