शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:25 IST

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष: तणावात असाल तर व्यक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आजच्या वेगवान जगात, कामाच्या ठिकाणी मागणी सतत वाढत आहे. अशावेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मात्र, सातत्याने कर्मचारी दबावात काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात खेळीमेळीचे वातावरण वाढवणे आवश्यक आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून १० ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक थीम ठरविली जाते. यावर्षी "हीच वेळ आहे, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची" ही थीम ठरविली आहे. दैनंदिन जीवनात आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो. पण, तीच व्यक्ती स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करते. हल्ली वाढती बेरोजगारी, राहणीमानाची पध्दती, आर्थिक अडचणी, स्पर्धा सामाजिक तसेच कौटुंबीक समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे वाढत्या मोबाइल फोनचे व्यसन यामुळे ज्या ठिकाणावर काम करतो, तिथे मानसिक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांवर चिडणे तसेच त्यांनी रागविल्यास बोचऱ्या शब्दांमुळे अनेक व्यक्तिना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

यातूनच नैराश्य, चिंता, समायोजनाची समस्या, झोपेमध्ये बदल, वजन कमी होणे, अशा मानसिक समस्या उद्भवतात. अशी लक्षणे ताणतणाव उद्भवल्यास जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

मानसिक आजाराची लक्षणे काय?सतत चिंताग्रस्त असणे, जास्त प्रमाणात काळजी, अपुरी झोप, वजन कमी होणे, जेवणाची इच्छा न होणे, कुटुंबापासून दूर होण्याची इच्छा, एकांतात राहणे, व्यसनाच्या आहारी जाणे (दारु, ड्रग्स), न्यूनगंडाची भावना आदी आहे

सकारात्मक मानसिक स्वास्थ्य ठेवण्याच्या या आहेत पद्धती 

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, मन रिते करा, नियमित व्यायाम, योगा करा, नियमित फळाचे सेवन करा. 
  • निसर्गाशी जवळीकता साधा, उदा. वृक्षारोपण करा, आवड तसेच छंदाची जोपासना करा. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण करा. झोपेला महत्व द्या, सकारात्मक विचारांचा समावेश करा.

तणावात आहात, येथे व्यक्त व्हा तणावात असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मानसिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात आपल्याला टेली मानस टोल फ्री क्रमांक १४४१६ / १८००८९१४४१६ या क्रमांकावर फोन करून व्यक्त व्हायचे आहे.

"सर्व आरोग्याप्रमाणे, जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले असते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी विश्रांती महत्त्वाची आहे. त्यामुळे, कामाच्या ठिकाणी, एखाद्या कर्मचाऱ्याने आजारी पडलेल्या स्थितीपर्यंत स्वतःला ढकलण्यापेक्षा एक दिवस सुटी घेऊन कुटुंबीयांशी, जवळच्या व्यक्तीशी वेळ घालविणे केव्हाही चांगले."- मोनाली मोहलें (नाखले) मानसशास्त्रज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा

"कर्मचारी अशा वातावरणाचा शोध घेतात जिथे त्याच्या कामाची किंमत असते. आरोग्याशी तडजोड न करता कामाच्या भाराबरोबरच अपेक्षांचे ओझे ओढले जाते. निरोगी मन हे निरोगी शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुसंवाद असणे गरजेचे आहे." - डॉ. सिस्टर सँली जॉन, सह. प्रा. मानसोपचार विभाग, सेवाग्राम

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यwardha-acवर्धा