शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी तंत्रनिकेतनलाच पसंती; इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॅानिक्ससाठी उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 23:16 IST

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३४० जागा आहेत तर उर्वरित सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ जागा  आहेत. एकूण १ हजार ८०८ जागेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची  सुरुवात केली होती. दुसरी, तिसरी फेरी होऊन त्यानंतर २६ सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशनची फेरी घेण्यात आली. त्यानंतर ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरला अतिरिक्त अंतिम संधी देऊन प्रवेश निश्चित करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : दहावीच्या निकालानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला विलंबाने सुरुवात झाली होती. आता  उच्च व तंत्र शिक्षण संचालनाच्यावतीने पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन आर्वी  येथील ९५ टक्के प्रवेश निश्चित झाले. त्यानंतर १२ सप्टेंबरपासून शासकीय तंत्रनिकेतन वर्गाला  सुरुवात झाली आहे. वर्धा जिल्ह्यात एक शासकीय, एक खासगी अनुदानित व सहा खासगी असे एकूण आठ तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३४० जागा आहेत तर उर्वरित सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ जागा  आहेत. एकूण १ हजार ८०८ जागेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची  सुरुवात केली होती. दुसरी, तिसरी फेरी होऊन त्यानंतर २६ सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशनची फेरी घेण्यात आली. त्यानंतर ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरला अतिरिक्त अंतिम संधी देऊन प्रवेश निश्चित करण्यात आले. आता उच्च व तंत्र शिक्षण संचालनाच्यावतीने पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात एकमेव असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रिक इंजिनियरिंग, इलेक्ट्रिक ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनियरिंगच्या शंभर टक्के जागा भरण्यात आल्या. तर सिव्हिल इंजिनियरिंग, केमिकल इंजिनियरिंगच्या ९० टक्के, मेकॅनिकल इंजिनियरला ८८ टक्के प्रवेश झाले आहे. या तुलनेत वर्धा जिल्ह्यातील उर्वरित सहा तंत्रनिकेतनमध्ये अद्यापही ५० टक्केपेक्षा अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय हेच विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सर्व विभागात ३४० जागामहाराष्ट्र शासनाच्या तंत्रनिकेतन संचालनाद्वारे वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन आहे. यामध्ये सहा विभाग मिळून ३४० जागा आहे.

खासगी तंत्रनिकेतनच्या १ हजार ४६२ जागावर्धा जिल्ह्यात एक खासगी अनुदानित तर सहा खासगी अशा एकूण सात खासगी तंत्रनिकेतन आहेत. या सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये एकूण १ हजार ४६२ जागा आहेत.

शासकीयच्या १७ जागा, तर खासगीच्या ८४५ जागा रिक्तआर्वी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ९५ टक्के  जागेवर विद्यार्थ्यांनी निश्चित करून प्रवेश घेतला.   कॉम्प्युटर इंजिनियरिंग १०० टक्के इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॅम्युनिकेशन इंजिनियरिंग १०० टक्के, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग १०० टक्के प्रवेश पूर्ण झाले.  सिव्हिल इंजिनियरच्या सहा, मेकॅनिकल इंजिनियरच्या सात व केमिकल इंजिनिअरच्या चार, अशा केवळ १७ जागा रिक्त आहे.  तर  जिल्ह्यातील सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ पैकी ६१७ जागा भरण्यात आल्या असून ८४५ म्हणजे ५० टक्केच्या वर जागा रिक्त आहे.

याकडे विद्यार्थ्यांचा ओढातंत्रनिकेतनचा कोणता कोर्स केल्यावर पटकन नोकरी मिळेल, अशा आशेत सर्व विद्यार्थी होते.  त्यानुसार त्यांनी चाचणी करून त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग व केमिकल इंजिनिअरिंग ब्रांचकडे विद्यार्थ्यांचा  जास्त ओढा दिसून आला.

यावर्षी शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेशाची परिस्थिती अत्यंत चांगली असून ९५ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहे. मागे दोन वर्ष कोरोनामुळे फरक पडला होता. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नोकरीची हमी, कॅम्पसमधून निवड, यामुळे मोठ्या प्रमाणात ॲडमिशन झाल्या. शासकीय तंत्रनिकेतन असल्याने फी कमी आहे. विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शन समुपदेशन आमच्या प्राध्यापकांनी केले होते. अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी सर्वदारे खुली असल्याने व  विविध कंपनीत नोकरीची हमी असल्याने सर्वच ट्रेंडला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. - डॉ. एम. ए. अली, प्राचार्य. 

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरी