शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पॉवरग्रीडने वाढविली वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:41 IST

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आशिया खंडातील सर्वांत मोठे पॉवरग्रीडचे सबस्टेशन आहे. याकरिता टॉवर लाईन उभारताना शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहे. अद्याप काही शेतकरी हक्काच्या मोबदल्याकरिता उंबरठे झिजवित आहेत.

ठळक मुद्देघरातच लागले वादजमिनीच्या मोबदल्याकरिता शेतकऱ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील देवळी येथे आशिया खंडातील सर्वांत मोठे पॉवरग्रीडचे सबस्टेशन आहे. या ठिकाणी विद्युत साठवून ती देशभरात पुरविली जाते. याकरिता टॉवर लाईन उभारताना शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहे. त्याचा मोबदला देताना मोठ्या अडचणी निर्माण केल्याने अद्याप काही शेतकरी हक्काच्या मोबदल्याकरिता उंबरठे झिजवित आहेत. जिल्हा प्रशासनाकडे गेल्यास पॉवरग्रीडच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो, तर पॉवरग्रीड जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याने शेतकऱ्यांची पायपीट होत आहे.आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देवळी येथील पॉवरग्रीडचे भूमिपूजन झाले आहे. देवळीतील एमआयडीसी परिसरात २२०, ४०० व ७४५ केव्हीचे पॉवर सबस्टेशन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विविध ठिकाणांहून येणारी विद्युत साठवून ती देशभरात पुरविली जाते. ही विद्युत वाहून आणण्याकरिता आणि वाहून नेण्याकरिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. दोन ते तीन टॉवर लाईन असल्याने या टॉवरकरिता शेतकऱ्यांची जवळपास प्रत्येकी अर्धा ते पाऊण एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पण; काही शेतकरी अद्याप मोबदला मिळविण्याकरिता कधी जिल्हा प्रशासन तर कधी पॉवरग्रीडच्या कार्यालयाचे येरझारा करताना मेटाकुटीस आले आहेत. वडिलोपार्र्जित शेती वडिलांच्याच नावे असताना काही ठिकाणी मोबदला मोठ्या भावानेच गडप केल्याचे चित्र आहे. अशावेळी पॉवरग्रीड कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असतानाही दाद मागावी कुणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

माहिती देण्यासाठी होतेय टाळाटाळग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती अद्याप वडील मृत असतानाही त्यांच्याच नावावर असल्याचे चित्र आहे. अशावेळी काही ठिकाणी वडिलांच्या नावे धनादेश काढल्यानंतर त्यांच्या वारसाच्या हमीपत्रानंतर तो मोबदला सर्व वारसांना देण्यात आला. मात्र, काही प्रकरणांमध्ये वडील मृत असल्यानंतरही इतर वारसांचे हमीपत्र न घेताही कंपनीने कुण्या एकाच्याच नावे धनादेश काढला. त्यामुळे इतर वारसान मोबदल्यापासून वंचित राहिले. आता त्या वारसांनी पाठपुरावा सुरू केला असता देवळीच्या पॉवरग्रीड कार्यालयाकडून योग्य माहिती दिली जात नाही. विशेषत: दुसरा धनादेश मात्र मय्यत वडिलांच्या नावे काढला जातो. एकाच शेताचा मोबदला देताना पहिला धनादेश वारसाच्या तर दुसरा धनादेश अधिकृत मालकांच्या नावे काढण्यात आला. त्यामुळे कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून शेतकºयांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मध्यस्थांमार्फत चालविला होता कारभारजमिनी अधिग्रहीत करताना तेथील जमिनीचा शासकीय दरानुसार मोबदला मिळणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मध्यस्थांमार्फत मोबदल्यामध्ये ‘सेटिंग’ करून टॉवरचे काम करुन घेतले. तार टाकतानाही उभ्या असलेल्या पिकांचा मोबदला दिला जाईल, असे सांगितले. मात्र, काम होताच कंपनीने हात झटकल्याने ज्यांचा जोर चालला, त्यांना योग्य मोबदला मिळाला. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची मोबदल्याकरिता फरपट सुरू असून देवळीच्या कार्यालयाकडून योग्य माहिती न देता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या नागरी येथील कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी