शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वीज चोरी; महावितरणला राज्यात १० कोटींचा फटका

By admin | Updated: June 26, 2014 23:27 IST

महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे.

वर्धा : महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्व वीजचोरांवर कारवाई सुरू आहे.महावितरणच्या भरारी पथकांनी नागपूर परिमंडळासह राज्यभरात वीजचोरी विरूद्ध मे महिन्यात मोहीम राबविली. यात नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया या पाच जिल्ह्यात कलम १३५ अंतर्गत ११८ तर १२६ अंतर्गत एकूण ३ व हुक टाकून वीजचोरी करणे, वीज वापराच्या तुलनेत कमी बिल येत असताना तसे सुचित न करणे, मीटर संथ असणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा कारणांमुळे दोषी आढळणाऱ्या ६५ वीजचोऱ्या अशा १८६ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या़ यात १ लाख ७१ हजार १९६ युनिटची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. या वीजचोऱ्यांमुळे केवळ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात महावितरणला ९१ लाख ६७ हजारांचा फटका बसला. महावितरणने यात वीजचोरांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. या मोहिमेत सिंगल व थ्री-फेज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक अशा ४६० ग्राहकांची तपासणी झाली़ यातून १८६ ग्राहकांकडे वीजचोरी वा गैरवापर होत असल्याचे दिसून आले़ महावितरण दक्षता, अंमल-बजावणी व सुरक्षा कक्ष नागपूरचे उपकार्यकारी संचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनात सर्व उपकार्यकारी अभियंता श्रीगडीवार, जी.सी. जयस्वाल, ए.डी. उईके, एस.व्ही. वाशिनकर, व्ही.एम. खाडे यांनी सर्व वीजचोऱ्या उघडकीस आणल्या.सर्वांवर वीज चोरीच्या रकमेशिवाय तडजोड रकमेच्या वा वीजचोरीच्या दंडाच्या रकमेपोटी किलोवॅटप्रमाणे वीज वापराच्या तुलनेत ४ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. वीजचोरी रोखण्यासाठी वीज कंपनीने ही मोहीम राबविली असून ग्राहकांचे सहकार्य गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)