शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

हमदापूर मार्गावरील खड्ड्यांनी अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:41 IST

हमदापूर-सेवाग्राम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे चुकविताना वाहनाला अपघात होतो.

ठळक मुद्देरस्ता डागडुजीकडे दुर्लक्ष : वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमदापूर-सेवाग्राम मार्गाची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे चुकविताना वाहनाला अपघात होतो. खड्ड्यांमुळे ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरट्रॉली पलटी झाली. सदर घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले.खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. दुचाकी चालकांना तर चांगलीच कसरत करावी लागते. अनेकदा वाहनांच्या आरशांना धक्का लागून वाहन अनियंत्रित होते. या रस्त्याचे बांधकाम करणे तर सोडाच साधी डागडुजी केली जात नाही. परिसरात ऊसाची तोडणी सुरू आहे. कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक याच मार्गाने होत आहे. कोपरा शिवारातून ऊसाची वाहतूक सुरू असताना रात्रीच्या सुमारास चालकास खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने ट्रॉली पलटली.रात्रीची वेळ असल्याने चालकाला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे चालकाला रस्त्यावरच रात्र काढण्याची वेळ आली. या रस्त्यावर यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या. या घटनेनंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात होते काय, याकडे लक्ष आहे.मांडगाव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसेस होतात नादुरुस्तमांडगाव - जिल्ह्यातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या समुद्रपूर-वर्धा रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस अनेकदा फेल होतात. सोमवारी या मार्गावर बोथुडा (पाटी) नजीक व मांडगाव बसस्थानकावर बसेस बंद पडल्या. ही समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रवाशांचे यात हाल होतात. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी तसेच महामंडळाने या मार्गावर भंगार बसेस पाठवू नये अशी मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघात