शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पोस्ट कोविड रूग्णांना घ्यावा लागतो खासगी रुग्णालयांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयांना कोविड सेंटर घोषिक केले. कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह याच दोन रुग्णालयात उपचार केले जात होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना केल्याने वर्धा जिल्हा एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. 

ठळक मुद्देजिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णालये नाहीच : आरोग्य यंत्रणाही बेदखल

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णालयेच नसल्याने काेरोनातून मुक्त झाल्यानंतर विविध प्रकारचा त्रास जाणवत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयांना कोविड सेंटर घोषिक केले. कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह याच दोन रुग्णालयात उपचार केले जात होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना केल्याने वर्धा जिल्हा एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालये असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेवर फारसा ताण आला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून चाचण्यांचे प्रमाण कमी होत गेले. याचाच परिणाम रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत गेली. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, समवयस्कांना श्वास घेणे, थकवा येणे व इतर प्रकारचा त्रास जाणवत आहे. पोस्ट कोविड सेंटर नसल्याने हे रुग्ण सध्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे चित्र आहे.  या रुग्णांची कुठल्याही यंत्रणेकडून सद्यस्थितीत विचारणा नसून वाॉच नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या अशा रुग्णांना सावंगी अथवा सेवाग्राम येथे जाण्यास सांगितले जात आहे. 

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्तावलीजिल्ह्यात कोरोनाचा प्रादुभर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी केली. मात्र, काेरोना आटोक्यात येताना दिसताच आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डाॉ. पुरुषोत्तम मडावी यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डाॉ. सचिन तडस हे रुजे झाले आहेत. दरम्यान अस्थिरोगतज्ज्ञ डाॉ. अनुपम हिवलेकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने सामान्य रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. रुग्णालय प्रशासनाला मागितलेली माहिती वेळीच उपलब्ध होत नाही. जबाबदार अधिकारी वारंवार फोन करूनही प्रतिसाद देत नाही. तसेच रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारीही गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल