शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

धाम नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:41 IST

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/ खरांगणा (मो.) : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे मुल्यांकन केले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.धाम नदीवरील हा राज्य महामार्गावर असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे बांधकाम साधारणत: १९६४ मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान या पुलावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक झाली. हा मार्ग मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या मार्गामुळे जवळपास १०० किलो मीटरचा फेरा वाचतो. या मार्गावर कोणताही टोलनाका नसल्याने ट्रक, कंटेनरची मोठी वर्दळ असते. या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी रात्री या पुलाचा मधातील एक खांब खचल्याने पुलही तुटला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष शेगांवकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करुन वर्धेकडे जाणारी वाहतूक बांगडापूर-माळेगाव-आकोली मार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भित्रे यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता साखरवाडे आणि नागपुरातील अधिकारीही घटनास्थळाला भेट देणार असल्याचे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले.या पुलाची एक बाजू खचायला लागली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाचे आॅडिट होणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाही.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा पुल खचला.- राजू राठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, मोरांगणामहाकालीचे प्रसिद्ध देवस्थान या मार्गावर आहे. ज्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती. नंतरच्या काळात मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरल्याने वाहतूक वाढली. लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करुन मार्ग मोकळा करावा. त्यामुळे लोकांना लांब पल्ल्याने जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.-नितीन अरबट, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी