शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के बालकांना पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:32 IST

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसरी फेरीचा श्रीगणेशा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देजि.प. सभापतींच्या हस्ते श्रीगणेशा : ‘दो बुंद जिंदगी के’ मोहिमेच्या दुसºया फेरीला सुरूवात

ऑनलाईन लोकमतवर्धा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसरी फेरीचा श्रीगणेशा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख १४ हजार ६ बालकांपैकी ९० टक्के बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, नेत्र तज्ज्ञ डॉ. मोहन सुटे, डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. लक्षदीप पारेकर, डॉ. विनीत झलके, प्रभाकर पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पोलिओची लस पाजून सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. देशामध्ये १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. सन २०१७-१८ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी रविवार ११ मार्चला राबविण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. रविवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ५ वर्षाआतील जिल्ह्यातील एकूण १ लाख १४ हजार ६ बालकांना सदर लस पाजण्याचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ९० टक्के बालकांना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओची लस पाजण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.सामाजिक संस्था व संघटना आल्या पुढेजिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १,१४,००६ बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी व सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, आयसीडीएस विभाग, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, आय.एम.ए., जिल्हा होमगार्डस, स्काऊटस्-गाईडस्, जिल्ह्यातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालये, दुरदर्शन, केबल टिव्ही नेटवर्क, याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था व संघटनांचे योगदान लाभल्याचे सांगण्यात आले.१ हजार ३४० केंद्रसदर मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात १ हजार ३४० लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागासाठी १ हजार १३९ तर शहरी क्षेत्रासाठी २०१ केंद्रांचा समावेश होता. सदर मोहिमेत एकुण ३ हजार २६० कर्मचारी व २६९ पर्यवेक्षक कार्यरत होते. शिवाय टोल नाके, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८६ ट्रान्झीट टिम्स सज्ज करण्यात आल्या होत्या. ९३ मोबाईल टिम्सद्वारे वीट भट्या, ऊस तोडणारे कामगार आदी भटक्या कुटुंबातील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली.५८ गावांतील २,९१० बालकांना लसमांडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५८ गावामध्ये पल्स पोलिओ मोहिमेच्या दुसºया फेरीचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी जुमनाके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमलता सोनकुसरे, जिल्हा पर्यवेक्षक बाबाराव कनेर, आरोग्य सहाय्यक अशोक भुजाडे, ढगे यांची उपस्थिती होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८ उपकेंद्रातील ५८ गावामध्ये ६४ बुथ व आठ फिरत्या पथकाद्वार २,९१० बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. बस स्थानक, यात्रेचे ठिकाण व वर्दळीच्या ठिकाणी बुथ लावण्यात आले होते. मोहिमेला १४० कर्मचारी १२ पर्यवेक्षकांनी सहकार्य केले. यावेळी एकनाथ देवढे, प्रशिल माटे, तुषार मिरगे, दिलीप पोहनकार, राजेश भोंगाडे, श्याम गोवर्धन, संदीप टेंभरे, संदीप नारीकर, कुंटे, गिरीश कोटंबकार, नरेश शंभरकर, पुष्पा पडोळे, दिक्षा अलोने आदींची उपस्थिती होती.