वर्धा: शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्या. यात सुमारे जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. या घरफोड्यांना आज पाच दिवसांचा कालावधी होत असून पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. आत या चोरट्यांच्या तपासात पोलीस पथक रवाना झाले आहेतएकाच रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडे पडल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तपासात सापडलेले काही कपडे व शस्त्रावरून पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागेल असे वाटत होते; मात्र यातही त्यांचा भ्रमनिरास झाला. अशात निवडणुकीची कामे असल्याने पोलीस पथक तयार करून ते चोरांच्या तपासात पाठविणे शक्य झाले नाही. याच कारणाने निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक रवाना झाले झाले. चोरी करण्याच्या पद्धतीवरून ते चोरटे ज्या भागातील आहेत त्याच भागात हे पथक रवाना झाले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. त्या भागात फिरण्याला दोन दिवस होत असून त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. अशात दिवाळी असल्याने नागरिकांत या चोरट्यांची भीती कायम आहे.(प्रतिनिधी)
‘त्या’ चोरांच्या तपासात पोलीस पथक रवाना
By admin | Updated: October 21, 2014 22:56 IST