शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पोलिसांनी ७४ गावांमध्ये राबविली दारूबंदी मोहीम

By admin | Updated: September 8, 2015 04:18 IST

पुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने गत दोन महिन्यांपासून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. यात ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७४

देवकांत चिचाटे ल्ल नाचणगावपुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने गत दोन महिन्यांपासून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. यात ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७४ गावांत दारूविक्रेत्यांवर धाडी टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय गावठी दारूच्या भट्ट्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. यात दोन महिन्यांत सुमारे पाच ते आठ लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुलगाव पोलीस ठाण्यात रूजू झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दारूबंदी मोहिमच हाती घेतली आहे. पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ७४ गावे समाविष्ट आहे. ५० किमीच्या परिसरात या ठाण्याची व्याप्ती आहे. यात काही संवेदनशील गावांचाही समावेश आहे. गावात महिलांना तसेच सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ठाणेदारांनी दारूबंदीच्या दिशेने प्रभावी पाऊल उचलले आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत दारूविक्रेत्यांविरूद्ध १५० च्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गावठी दारूचाच अधिक समावेश आहे. मोटरसायकलद्वारे होत असलेली अवैध दारूची वाहतूक नाकेबंदी करीत रोखण्यात आली. पुलगाव पोलिसांकडून कांदेगाव, चोंढी, डोरली, विरूळ (आ.), पिंपळगाव, कुरझडी (फोर्ट), लालबर्डी, इंझाळा, वायफड, कोळोणा, कवठा, शेंद्री, आगरगाव व दहेगाव आदी गावांमध्ये दारूभट्ट्यांवर धाडी टाकण्यात आल्या. यात भट्ट्या उद्ध्वस्त करीत ड्रम उद्ध्वस्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीचा वापर करीत जमिनीमध्ये गाडलेले ड्रम खणून उद्ध्वस्त केले. घटनास्थळीच पंचनामा केला गेला. दारूबंदीबाबत गावात ग्रामसभेच्या माध्यमातून परिवर्तनात्मक बदलाची माहिती देण्यात येत आहे. या मोहिमेत ठाणेदार शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. हाके, शेख, खेडेकर, मुलबैले, लसुंते आदींनी सहभाग घेतला.दारूबंदी महिला मंडळांचेही मिळतेय सहकार्य४पुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात दारूबंदीला मूर्त रूप यावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. दारूबंदी महिला मंडळांच्या मागणीवरून दारूविक्रेत्यांविरूद्धच्या धाडसत्राला वेग देण्यात आला आहे. या कार्यात दारूबंदी महिला मंडळांचेही सहकार्य लाभत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय अमरावती जिल्हा लागून असल्याने दारूविक्री बंद होऊ शकणारी नसली तरी त्यावर काही प्रमाणात आळा घालणे शक्य आहे. यासाठी ठाणेदार शिरतोडे व पोलीस कर्मचाऱ्यांकडून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. दोन महिन्यांत १५० च्या वर व्रिकेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.४पुलगाव पोलिसांनी कांदेगाव, चोंढी, डोरली, विरूळ, पिंपळगाव, कुरझडी फोर्ट, लालबर्डी, इंझाळा, वायफड, कोळोणा, कवठा, शेंद्री, आगरगाव, दहेगाव यासह परिसरातील अन्य गावांतही दारूविक्रेत्यांविरूद्ध धाडसत्र राबविले. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शहरातील दारूविक्रेत्यांविरूद्धही पुलगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.