शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

सांगा मॅडम, शिकायचे कसे अन् बसायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:01 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या  विवंचनेमुळे  ‘प्रश्नचिन्ह’  शाळेत  शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदानच बंद झाले आहे. शाळेत बसायला अन् शिकायलाही जागा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या कानाकोपऱ्यातून, वीटभट्ट्याहून, दुर्गम पाड्यातून शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळा  समृद्द्धी महामार्गात जमीनदोस्त झाली. त्यामुळे आता शिकायचे कुठे अन् बसायचे कुठे, असे  भलेमोठे ‘प्रश्नचिन्ह’ त्यांच्यासमोर उभे ठाकले. तेच प्रश्नचिन्ह घेऊन ते चिमुकले आपल्या पालकांसमवेत  शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या  विवंचनेमुळे  ‘प्रश्नचिन्ह’  शाळेत  शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदानच बंद झाले आहे. शाळेत बसायला अन् शिकायलाही जागा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने आता प्रश्नचिन्ह शाळेला पक्की इमारत, वाचनालय व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी. या प्रमुख मागणीसाठी  विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले अन् याच परिसरात शाळा भरून  आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, यावेळी प्रतिभा भोसले, रातराणी भोसले, नुरदास भोसले, नलू पवार, वंदना पवार, अधिन भोसले  आदींच्या शिष्टमंडळाने  मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी  पवनीत कौर यांना दिले. यावर योग्य कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याने आंदोलन निवळले.दरम्यान, वंचित घटकातील या  विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केलेल्या अभिनव आंदोलनाकडे नागरिकांचेही लक्ष वेधले. 

‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’समृद्द्धी महामार्गामुळे जमीनदोस्त झालेली इमारत व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी, याकरिता  थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भरलेल्या शाळेत राष्ट्रगीत, संविधान  प्रस्तावनेचे वाचन करीत ‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’ ही प्रार्थना गात उपस्थितांचे लक्ष वेधले. 

काय आहेत मागण्या?- मंगरूळ चव्हाळा येथील समृद्द्धी महामार्गात प्रश्नचिन्ह शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे  शाळेला नवीन पक्की इमारत,  मुुलाकरिता प्रसाधनगृह, स्नानगृह, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, फर्निचरसह  वाचनालय बांधून द्यावे, शाळेच्या जुन्या इमारतीलगतची शासनाची ई-क्लास जमीन शैक्षणिक प्रकल्पाकरिता विशेष बाब म्हणून कायदेशीर हस्तांतरित करावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारी