शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात ‘रात्रीच खेळ चाले’; पदाधिकारी पैसे घेऊन कामांचे करतात वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

जि.प. बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील वर्धा, हिंंगणघाट, कारंजा, देवळी व आर्वी या तालुक्यांतील जवळपास ८९ कामांसाठी नुकताच ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, खडीकरण व सिमेंटीकरण आदी कामांचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामाकरिता निविदा मॅनेज करण्यासाठी जि.प.च्या काही पदाधिकारी व सदस्यांच्या एका कंत्राटदाराच्या मध्यस्तीने वर्ध्यात बैठकी झाल्यात.

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाच्या सभापतींचा आरोप : बांधकाम विभागातील कामांच्या निविदा ‘मॅनेज’ करण्यातही ते पदाधिकारी आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालयात भाजपाची एकहाती सत्ता असून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव आहे. एकमेकांना विश्वासात न घेता काही मोजकेच पदाधिकारी आपला मनमर्जी कारभार चालवित आहे. मर्जीतील कंत्राटदारांना कामाचे वाटप करणे, कामाच्या निविदा मॅनेज करणे आदी प्रकार चांगलेच चर्चेत आहे. आता तर सत्ताधारी पक्षाच्या सभापतीनेच भ्रष्टाचाराचा आरोप करुन चौकशीची मागणी केल्याने पदाधिकाऱ्यांमधील नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. जि.प. बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील वर्धा, हिंंगणघाट, कारंजा, देवळी व आर्वी या तालुक्यांतील जवळपास ८९ कामांसाठी नुकताच ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, खडीकरण व सिमेंटीकरण आदी कामांचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामाकरिता निविदा मॅनेज करण्यासाठी जि.प.च्या काही पदाधिकारी व सदस्यांच्या एका कंत्राटदाराच्या मध्यस्तीने वर्ध्यात बैठकी झाल्यात. यातील डांबरीकरणाचे काम मॅनेज करुन ठराविक कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती मिळाल्याने ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्तही प्रकाशित केले होते. आता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरस्वती मडावी यांनी ‘जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार असून काही पदाधिकारी रात्री पैसे घेऊन कामे वाटप करतात’ असा आरोप केला आहे. त्यामुळे जि.प.तील कामांमध्ये नक्कीच पाणी मुरत असल्याचे उघड झाले. काही कंत्राटदार पदाधिकाऱ्यांच्या अधिनस्त असल्याने त्यांच्या हिताकरिता कामाचे कंत्राट ‘मॅनेज’ करण्यासाठी अधिकाऱ्यांवरही दबावतंत्राचा वापर होत असल्याची माहिती आहे. आता सभापती सरस्वती मडावी यांनीच भ्रष्टाचाराचा आरोप करीत वाटप करण्यात आलेल्या कामांची चौकशी करुन ती कामे थांबविण्यात यावी, अशा सूचना मुख्य कार्यपालन  अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सर्व सदस्यांना समप्रमाणात कामांचे वाटप कराशिक्षण समिती, समाजकल्याण समिती व इतर समित्यांमध्ये सभापतींनी त्यांच्याच समितीतील सदस्यांना कामाचे वाटप केले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अभियंता यांनी या समित्यांची सर्व कामे रद्द करुन नव्याने सर्व सदस्यांना सम प्रमाणात कामाचे वाटप करावे, असा ठराव बुधवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील हे काम ‘वॉर’ तापण्याची शक्यता आहे.

महिला व बालकल्याण समितींतर्गत येणाऱ्या अंगणवाडी दुरुस्तीची कामे ४५ सदस्यांना वाटप केली. तरीही नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दोन सदस्यांनी केवळ महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना कामे वाटप केले, असा आक्षेप घेतला. कामे वाटपाची ही प्रक्रीया होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. या दरम्यान सर्वसाधारण सभा झाली, तेव्हा कुणीही याबाबत आक्षेप घेतला नाही. ही कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे असताना आता अचानक हा आक्षेप घेणे, म्हणजे ही विकास कामे बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचे लक्षात आल्यानेच हा निर्णय घेतला.- सरस्वती मडावी, सभापती, महिला व बालकल्याण समिती.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpwdसार्वजनिक बांधकाम विभाग