शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कमळाचे फुल देऊन रायुकॉद्वारे पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:36 IST

पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. ८५.१८ रुपये लिटर पेट्रोल व ७१.६६ रुपये लिटर डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असताना पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहे.

ठळक मुद्देपंप चालक व नागरिकांनीही नोंदविल्या शासनाविरूद्ध प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. ८५.१८ रुपये लिटर पेट्रोल व ७१.६६ रुपये लिटर डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असताना पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक दर आहे. याविरूद्ध बुधवारी सकाळी १० वाजता बजाज चौकात रायुकाँने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपांवरील वाहन चालकांना कमळाचे फुल देत अभिनव पद्धतीने आंदोलन करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला.भाजपाला सत्तेवर येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती बॅलर ११० डॉलरपेक्षा अधिक भाव असताना देशात ७० रुपये लिटर पेट्रोल व ४५ रुपये लिटर डिझेल चालत नव्हते. यासाठी आंदोलन केले होते. ‘बहुत हो गई पेट्रोल और डिझेल की मार’, असे म्हणत भाजपाने सत्ता मिळविली आणि सेत्तेवर येताच पेट्रोल व डिझलचे भाव वाढविले आहे. ८५.१८ रुपये पेट्रोल व ७१.६६ रुपये डिझेलचे भाव म्हणजे १४० टक्के अधिक भावाने विक्री होत आहे. हे सरकार सामान्यांच्या जीवावर उठले असून उद्योजकांचे हित साधणारे असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांनी सांगितले.कमळाचे फुल देऊन पेट्रोल दरवाढीचा निषेध करताना नागरिकांनी, मोदी सरकारने आमची फसवणूक केली. सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार व महागाई कमी करू, असे आश्वासन दिले होते. चार वर्षे होऊनही काही कमी झाले नाही. उलट प्रचंड महागाई वाढली आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. पेट्रोल भरणे आमच्या आवाक्याच्या बाहेर झाले असून मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली. पेट्रोल पंप चालकांनीही लिटर मागे मिळणारा नफा हा अत्यल्प असून सर्व कर हे राज्य व केंद्र शासनाला द्यावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले तरच पेट्रोल व डिझल वाढत होते आणि कमी झाले तर दर कमी होत होते; पण आता असे होताना दिसत नाही. उलट भाव वाढत असल्याच्या प्रतिक्रीया नोंदविल्या.आंदोलनात समिर देशमुख, संदीप किटे, शरयू वांदिले, सोनल ठाकरे, अजय गौळकर, प्रफूल मोरे, संदेश किटे, अर्चित निघडे, विनय डहाके, अंबादास वानखेडे, बाबाराव खाडे, टी. सी. राऊत, मधुकर टोणपे, उत्कर्ष देशमुख, विना दाते, कुमूद लाजुरकर, शारदा केने, दुर्गा धूरत यासह रायुकाँचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस