शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

By महेश सायखेडे | Updated: February 21, 2023 20:11 IST

वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

वर्धा: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिला. नितीन ओमदास जवादे (३५) रा. कुटकी (तळोदी), ता. सेल असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपी नितीन जवादे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास, भादंविच्या कलम ३४१ अंतर्गत एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्यांचा कारावास, भांदविच्या कलम ५०६ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.भर रस्त्यात केला होता विनयभंगसंबंधित प्रकरणातील पीडिता ही १९ ऑगस्ट २०१९ ला शाळेतून घरी सायकलने जात होती. दरम्यान, दुचाकीने आलेल्या आरोपीने तिला वाटेत अडवून तू माझ्यासोबत चल, असा तगादा लावत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने आरोपीच्या तावडीतून स्वत: ची सुटका करून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली होती.पाच साक्षीदारांची तपासली साक्षसंबंधित प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून सुजित पांडव व देवेंद्र कडू यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय