शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

coronavirus; हरियाणातून वर्ध्यात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:51 IST

दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.दत्तपुर येथे महारोगी सेवा संस्थाच्या परिसरात सोलर एनर्जीवर आधारित प्रकल्प उभारणीसाठी 5 जूनला गुडगाव येथून 65 वर्षीय पुरुष कारने वर्धेत आलेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे. त्यांच्याकडे कोणताही प्रवेश पास नसल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यांना 6 जूनला दत्तपुर येथील विश्राम गृहात विलगीकरण करण्यात आले. दरम्यान 8 जूनला त्यांना पाठदुखीचा त्रास झाल्याने सामान्य रुग्णालायत तपासणी केली व औषधोपचार करून परत पाठविण्यात आले.त्यांना खोकल्याचा त्रास व्हायला लागल्यावर 9 जूनला सामान्य रुग्णालयात त्यांचा घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीला पाठविण्यात आला होता. काल रात्री त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे 1 वाजता रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथे भरती करण्यात आले. आज त्यांचा स्त्राव तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस