शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:54 IST

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने ठिकठिकाणी पहाटे धडक देऊन सुमारे १० लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्दे जि.प. स्वच्छता विभागाने ५१३ ग्रा.पं. सुंदर करण्याचा उचलला विडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने ठिकठिकाणी पहाटे धडक देऊन सुमारे १० लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा या गावात करण्यात आली.शाश्वत स्वच्छता हा हेतू केंद्रस्थानी ठेवून जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात व जि. प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांच्या नेतृत्त्वात जिल्हास्तरीय दोन गुडमॉर्निग पथक तयार करण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील आठ तालुक्यात प्रत्येकी एक असे तालुक्याचे गुडमॉर्निग पथकही तयार करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरीय गुडमॉर्निग पथकातील सदस्य गत तीन महिन्यांपासून प्रत्येक आठवत्यातील मंगळवार व गुरूवारी विविध गावात धडक देत लोटाबहाद्दरांना समज देत आहेत. तसेच उघड्यावर प्रात:विधीकरिता गेल्यास त्याचे आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हेही पटवून देत आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात हाती घेण्यात आलेला हा उपक्रम मे नंतर जून महिन्यातही राबविल्या जात आहे. तर पुढील तीन महिने हा उपक्रम पुन्हा नव्याने व प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना वरिष्ठांकडून जि. प. च्या स्वच्छता विभागाला प्राप्त झाल्या आहेत. शास्वत स्वच्छता या हेतूने व लोटाबहाद्दरांना समज देण्यासाठी गुरूवारी जिल्ह्यास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने गुंजखेडा, हिवरा हाडके यासह देवळी तालुक्यातील इतरही गावांमध्ये धडक देत पथकातील विनोद खोब्रागडे, सचिन खाडे, संपदा बोधनकर, नरेंद्र येणोरकर, कैलास बाळबुधे, अंकुर पोहाणे, अशोक रत्नपारखी, महेश डोईजोड यांनी त्यांना उघड्यावर प्रात:विधीस जाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तर शुक्रवारीही अनेकांना सदर पथकाने समज दिली.सहकार्य न करणाऱ्या ग्रा.पं.वर होणार कारवाईजि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने शास्वत स्वच्छतेसाठी गत तीन महिन्यांपासून विशेष प्रयत्न केले जात आहे; पण काही ग्रा.पं. सदर उपक्रमाला प्रतिसादच देत नसल्याचे दिसून येते. ज्या ग्रा.पं. लोटाबहाद्दूरांना समज देण्यासाठी व स्वच्छ गावाकडे पाठ करेल अशांचा अहवाल तयार करून तो योग्य कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.यापुढे थेट दंडगत तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने पहाटेच धडक देवून अनेक लोटाबहाद्दरांना समज दिली. परंतु, अनेक लोटाबहाद्दर उघड्यावर प्रात:विधीकरिता जातच असल्याचे निदर्शनास येत असल्याने उपक्रम राबविताना यापुढील तीन महिन्यात लोटाबहाद्दरांना समज देत थेट १०० रुपये ते १ हजार २०० रुपयेपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत