वर्धा बसस्थानकावर अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:04+5:30

आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येऊन अत्यावश्यक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. बसस्थानकावर नियमित स्वच्छता राहावी, यासाठी ब्रिक्स कंपनीला कंत्राट देण्यात आला. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

The peak of uncleanness at Wardha bus station | वर्धा बसस्थानकावर अस्वच्छतेचा कळस

वर्धा बसस्थानकावर अस्वच्छतेचा कळस

Next
ठळक मुद्देआमदारांनी घेतली आढावा बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा बस स्थानकावर अस्वच्छतेने कळस गाळला आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी आमदारांना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने सोमवारी आमदार डॉ.भोयर यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले. स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्यात याव्या, असे निर्देश दिले.
आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येऊन अत्यावश्यक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. बसस्थानकावर नियमित स्वच्छता राहावी, यासाठी ब्रिक्स कंपनीला कंत्राट देण्यात आला. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोमवारी आ. भोयर यांनी बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रसाधनगृहाची साफसफाई होत नसल्याचे आढळून आले. परिसरात अनेक ठिकाणी थुंकून ठेवण्यात आले. चौकशी कक्षातदेखील अस्वच्छता आढळून आली. बसस्थानक व परिसरात साफसफाई नियमित होत नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे आमदारांनी परिवहन विभागाच्या अधिकाºयांची विश्रामगृहात बैठक बोलाविली. बैठकीला विभागीय नियंत्रक चेतन हसबनिस, कनिष्ठ अभियंता सुधीर गुल्हाणे, सहायक वाहतूक अधीक्षक पिसे, ब्रिक्स कंपनीचे सुपरवायझर गणेश, जयंत कावळे, पवन परियाल, आशिष कुचेवार, सभापती सरस्वती मडावी, प्रशांत बुर्ले, नगरसेवक नीलेश किटे, अभिषेक त्रिवेदी, वरुण पाठक, राजू मडावी, श्रीधर देशमुख, सरपंच अजय गौळकार, सचिन खोसे, मनोज तरारे, गिरीश कांबळे, अब्बास अली बोहरा, मोहित उमाटे, प्रशांत झलके, मनोज भुतडा आदी उपस्थित होते.

Web Title: The peak of uncleanness at Wardha bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.