शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; ओडिशाचा एक रुग्ण वर्ध्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:00 IST

ओडिशातील एक रुग्ण वर्ध्याच्या यादीत कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या शासनाच्या लेखी १४ आहे.

ठळक मुद्दे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लेखी १४ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींनी रुग्णसंख्या २५ च्या घरात पोहोचविली. प्रत्यक्षात जिल्ह्यातील रुग्णसंख्या १३ असून बाहेर जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यात आल्याने आकडा एकदम वाढला. तो कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शासनदरबारी प्रयत्न केल्यानंतरही ओडिशातील एक रुग्ण वर्ध्याच्या यादीत कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या शासनाच्या लेखी १४ आहे.जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या अखेरपर्यंत जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहिला. मात्र, एका मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या हळूहळू वाढतच गेली. लॉकडाऊन काळात पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यात राहणारे वर्ध्यात दाखल झाले. तसेच काही इतर जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यातील सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात उपचाराकरिता आल्यानंतर त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे वर्ध्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एकदम २५ वर पोहोचला. या रुग्णांमध्ये वर्धा जिल्ह्यासह अमरावती, अकोला, वाशिम, उत्तरप्रदेश, ओडिशा, गोरखपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आपापल्या गावी सोडण्यात आले. बाहेर जिल्ह्यातील रुग्णांना वर्धा जिल्ह्याच्या यादीतून वगळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी करण्यात आली. तरीही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीमध्ये ओडिशा येथील एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या यादीमध्ये कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ दाखविली जात आहे. जिल्ह्यातील १३ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा जणांवर उपचार सुरू आहेत. यातील चौघे वर्ध्यात, एक नागपूर आणि एक सिकंदराबादमध्ये दाखल आहे. त्यामुळे ओडिशातील एक रुग्ण वर्धा जिल्ह्याच्या यादीतून वगळण्याची गरज व्यक्त होत आहे.वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या १३ रुग्ण असून ओडिशा येथील एक रुग्ण चुकून महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर वर्धा जिल्ह्यामध्ये दाखविला जात आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४ दिसत आहे. यासाठी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच तो रुग्ण पोर्टलवरून कमी होईल.डॉ.अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस