शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नागपुरात मृत घोषित रुग्ण गावात जीवंत; नातेवाईकांनी गाठले रुग्णालय

By आनंद इंगोले | Updated: February 22, 2023 21:01 IST

पालोरा येथील घटना : कारंजातील डॉक्टरांनीही ठरविले मृत

कारंजा (घाडगे)(वर्धा) : तालुक्यातील पालोरा येथील रुग्णाची प्रकृती खालावल्याने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नागपुरला हलविण्यास सांगितल्याने रुग्णाला नागपुरच्या रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर घरी आणून अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईकांना मृताच्या डोळ्याची उघडझाप झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा कारंजातील रुग्णालय गाठले. येथील डॉक्टरांनीही पुन्हा मृत घोषित केल्याने या प्रकारावर पडदा पडला.

दिलीप रामोजी ढोले (३४) रा. पालोरा असे मृताचे नाव आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त््यांना २१ फेब्रवारीला रात्री २ वाजतादरम्यान कारंजा येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन रुग्णाला नागपुरला हलविण्यास सांगितले. यावरुन नातेवाईकांनी रुग्णाला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्यानंतर दिलीप यांचा मृतदेह पालोरा या गावी परत आणला. आज त्यांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करुन आंघोळ घालत असताना त्यांनी डोळ्याची उघडझाप केल्याचे आणि अंग गरम असल्याचे बहिण संगिता यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपला भाऊ जीवंत आहे, असे समजून सायंकाळी साडेसहा वाजतादरम्यान पुन्हा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. येथील डॉ. स्मिता करणाके यांनीही मृत घोषित केले.दिलीप ढोले यांच्या नातेवाईकांना ते जीवंत असल्याचा भास होऊ शकतो. यातूनच हा प्रकार घडला असावा. अन्यथा असा प्रकार घडू शकत नाही. मृत व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा इसीजी पल्स किंवा इतर शारीरिक कोणत्याही हालचाली सक्रीय नव्हत्या.डॉ. स्मिता करणाके, ग्रामीण रुग्णालय, कारंजा (घा.)

टॅग्स :wardha-acवर्धाnagpurनागपूर