बोगस कॉन्व्हेंट : शिक्षण विभागाकडून अभय, कारवाई करण्याकरिता कुचराईआष्टी (शहीद) : सर्वत्र इंग्रजी शाळांचे पीक आले असून आष्टी तालुक्यात शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी नसताना अनेक सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू आहेत. इयत्ता पहिली ते १२वी पर्यंत मान्यता असल्याचा प्रचार करून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा बोगस संस्था चालकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी शिक्षणाधिकारी वर्धा यांच्याकडे केली असून याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी अधिक प्रगत व्हावा म्हणून केंद्र तथा राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शिक्षण क्षेत्रातील आमुलाग्र बदल त्याचे द्योतक आहे. ग्रामीण भागापर्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ठिकठिकाणी सीबीएसई पॅटर्नची मंजुरी मिळवून विद्यार्थी घडविणे सुरू आहे.
सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांची दिशाभूल
By admin | Updated: May 16, 2016 02:16 IST