बोथुडा : नजीकच्या सावंगी (देरडा) परिसरात बिबट्याचे वास्तव्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. मंगळवारी दुपारी सावंगी येथील एक वासरू व बकरी बिबट्याने फस्त केली तर धानोली येथील बोकड व बकरी ठार केल्याची घटना उघडकीस आली.सावंगी (देरडा) येथील प्रमोद म्हसकर यांच्या मालकीचे सागवान व बाभुळीचे बीड आहे. येथे बिबट लपून असल्याचा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे. बिबट्याने दोन दिवसांत चार जनावरांचा फडशा पाडला. विनोद हरिभाऊ डंभारे यांच्या मालकीचे वासरू तर हरीश टेकाम यांच्या मालकीची बकरी ठार केली. धानोली येथील दानव यांच्या मालकीचे बोकड व बकरी बिबट्याच्या हल्ल्याची बळी ठरली.(वार्ताहर)
सावंगी परिसरात बिबट्याची दहशत
By admin | Updated: February 11, 2016 02:31 IST