शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विदेशी पाहुण्यांच्या आगमनाने गजबजली वर्धा जिल्ह्यातील जलाशये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:40 IST

अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. असे पक्षी आता वर्ध्यातील तलाव, नदी व जलाशयाकडे कुच करीत आहेत.

ठळक मुद्देपक्षीप्रेमींसाठी पर्वणी उत्तरेकडून हजारो मैलाचा प्रवास करीत दक्षिणेत आसरा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिवाळा लागला की उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अन्नाची कमतरता जाणवत असून थंडीही पक्षांना असह्य होते. त्यामुळे अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. असे पक्षी आता वर्ध्यातील तलाव, नदी व जलाशयाकडे कुच करीत आहे. सध्या या विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असली तरी डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विदेशी पाहुण्यांचे आगमण पक्षीपे्रमिंसाठी पर्वणीच ठरत आहे.हिवाळ्यात नियमित स्थलांतर करुन येणारे पक्षी जिल्ह्यातील विविध तलाव, नदी व जलाशयावर पहावयास मिळत आहे. आतापर्यंत चक्रवाक, पट्टकादंब, तलवार बदक, चक्रांग, तरंग बदक, मोठी लालसरी,मलिन बदक, शेकाट्या, सामान्य पाणलावा, सामान्य हिरवा टिलवा, हिरवी तुतारी यासह काळा करकोचा, सर्पपक्षी, पिवळा धोबी, आॅस्प्रे आदी पक्षी आढळून आले आहेत. स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणखी काही प्रकार व संख्या वाढण्याची शक्यता आहे. पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमिंसाठी हा कालावधी आनंद व उत्साहाचा असतो. या दिवसात जिल्ह्याती जलायशाकडे साऱ्यांचीच पक्षी निरिक्षणासाठी धाव असते.सुट्टीच्या दिवसात तर पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी पक्षी अभ्यासक व पक्षीपे्रमिंचेही जथ्थे लपून-छपून पक्षांच्या हालचाली आपल्या नजरेत कैद करुन घेतात. सध्या वाढत्या प्रदुषणाचा फ टका या पाणपक्षांच्या अधिवासालाही बसत आहे. या अधिवासांचा ºहास होत असल्याने गाळपेरा आणि झिरो फिशींग नेट च्या परिणामामुळे स्थलांतरीत पक्षांची संख्या दिवसेदिवस रोडावत असल्याचे मत पक्षीपे्रमींकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या सुवर्णक्षणालाही मुकावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्ष्यांच्या नोंदी ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर कराव्यापक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हे क्षण डोळ्यात साठविण्यासाठी पक्षीप्रेमिंनी निरिक्षणासाठी बाहेर पडावे. पक्षी निरिक्षणासाठी जाताना पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी निसर्गप्रेमींनी घ्यावी. तसेच शाळा व महाविद्यालयांनीही स्थलांतरीत पक्षीनिरिक्षणासाठी परिसरातील तलावावर शैक्षणिक सहली काढाव्यात.सोबतच आढलेल्या पक्ष्यांच्या नोंदी ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर कराव्या, असे आवाहन बहार नेचरचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, उपाध्यक्ष रविंद्र पाटील, दिलीप वीरखेडे, राहुल तेलरांधे, डॉ.बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, डॉ.जयंत वाघ, जयंत सबाने, वैभव देशमुख, राहुल वकारे, स्रेहल कुबडे, अविनाश भोळे, विनोद साळवे यांनी केले आहे.

रणगोजा पक्ष्यांची वर्ध्यात प्रथमच नोंदहिवाळी पाहुणा मुख्यत्वे वाळवंटी प्रदेशात अधिवास असणारा व विदर्भात तु

रळक प्रमाणात नोंद करण्यात आलेला रणगोजाची वर्धा जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षणादरम्यान बहार नेचर फाऊंडेशचे दर्शन दुधाने व आशुतोष विभारे यांना हा पक्षी आर्वी तालुक्यात आढळून आला. जिल्ह्यात दाखल झालेल्या पाहुण्या पक्षांमध्ये प्रथमच करण्यात आलेली रणगोजाची नोंद महत्वपुर्ण ठरली आहे. रणगोजा हा पक्षी आकाराने चिमणी एवढा असतो. साधारणत: पिवळट पांढºया रंगाचा हा पक्षी असून नराचा कंठ व डोक्याखालील भागाचा रंग काळा, भुवई पिवळट तर शेवटीचा रंग काळपट असणारा हा पक्षी दिसायला फार सुंदर दिसतो. मराठीत रणगोजासह रणगप्पीदास असेही नाव आहे. या पक्ष्याची वीण बलुचीस्तान या भागात तर त्याची हिवाळातील व्याप्ती राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रापर्यंत असते. निमवाळवंटी ओसाड प्रदेश आणि वाळवंटी भागातील ओलीताचे क्षेत्र हा त्याचा अधिवास असतो.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य