वर्धा : जि़प़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने ‘हमारा जल, हमारा जीवन’ ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ जानेवारी ते मार्च दरम्यान टंचाई आरखड्यात समाविष्ट जिल्ह्यातील ९४ गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गट संसाधन केंद्र व जलस्वराज्य-दोनचे सर्व कर्मचारी र्कायशाळेला हजर होते़ अध्यक्षस्थानी जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे तर अतिथी म्हणून जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, अतिरिक्त सिईओ प्रमोद पवार उपस्थित होते़ वरिष्ठ भू-वैज्ञानिक नितीन महाजन, उपअभियंता अजय बेले, वैज्ञानिक अभय निवसरकर, कार्यकारी अभियंता शेषराव सहारे यांनी सादरीकरणातून विषयाचे महत्त्व पटवून दिले़ शाश्वत विकासासाठी पाणी व्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर ही जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली़ पालोती या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावाची निवड करण्यात आली़ एकाच गावाची कार्यशाळा घेण्यापेक्षा सिईओंच्या सूचनेवर ९४ गावच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यशाळेत समावेश करण्यात आला़ कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता आऱडी़ वाहने यांनी केले तर आभार अभिजीत धाराशीवकर यांनी मानले़(कार्यालय प्रतिनिधी)
‘हमारा जल, हमारा जीवन’ कार्यशाळा
By admin | Updated: January 22, 2015 02:01 IST