कोरोनाच्या सावटात इतर रुग्ण लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:27+5:30

राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Other patients locked down in the corona | कोरोनाच्या सावटात इतर रुग्ण लॉक डाऊन

कोरोनाच्या सावटात इतर रुग्ण लॉक डाऊन

Next
ठळक मुद्देडॉक्टरही भेटणे कठीणच : ज्येष्ठ नागरिकांसमोर संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ९ मार्चपासून राज्यात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोणाच्या या साथीत इतर आजारांचे रूग्ण घरातच लॉकडाऊन झाल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसून येत आहे.
राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अनेकजण शहरातील खाजगी डॉक्टरांकडे उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, बीपी तपासणे, मणक्याचे आजार यासह अनेक आजाराच्या उपचारासाठी जात होते. मात्र कोरोनाच्या भितीपोटी अशा रूग्णांनी डॉक्टरकडे जाणेही टाळले. बरेच डॉक्टर केवळ मोबाईलवरच औषंधाबाबत माहिती सांगत आहेत.
दवाखान्यात येऊ नका, असा थेट सल्ला इतर आजाराच्या रूग्णांना दिला जात आहे. खोकला, सर्दी, ताप या उन्हाळ्यातील नियमित आजारातही डॉक्टरांकडे जाण्याचे अनेकांनी टाळले. सरकारी रूग्णालयात गेल्यास आपल्याला क्वॉरनटाईन करतील. या भितीपोटी जिल्हा रूग्णालयातही अशा जेष्ठ नागरीकांनी जाण्याचे टाळले त्यामुळे खाजगी दवाखान्यासह जिल्हा रूग्णालय तसेच सावंगी व सेवाग्राम रूग्णालयातही इतर आजार रूग्णांची संख्या रोडावलेलीच आहे. काही रूग्णांचे नेहमीच डॉक्टरसुध्दा त्यांना या काळात भेटण्यास बोलाविण्याचे टाळत असल्यांचे दिसते.

वर्ध्यांत बहुतांश खासगी दवाखाने बंदच
शहरात काही डॉक्टर्स आपले दवाखाने नियमितपणे उघडून रूग्णांवर उपचार करतांना दिसत आहे. मात्र काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले आहे. मोबाईल फोनवरच ते रूग्णांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे. तर बऱ्याच रूग्णांनी औषध विक्रेत्यांच्या सल्यांनी आपल्या व्याधीवरील नियमीत औषधोपचार घेतला आहे.


ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या घटली
लॉकडाऊनच्या या स्थितीत ग्रामीण भागात शहराकडे येणाऱ्या रूग्णांचा ओढाही मंदावला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बंद असल्याने यातून अर्ध्या तिकीटवर प्रवास करून अनेक जण रूग्णांलयात येत होते ते सुध्दा लॉकडाऊन झालेत. कोरोनाच्या या साथीत इतर आजार रूग्ण या तीन महिण्यात कमी झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Other patients locked down in the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.