शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:19 IST

चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देचार युवकांचा पुढाकार : पुणे ते आनंदवन सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.किसन ताकमोडे अहमदनगर, गणेश नरसाळे सोलापूर, राजेंद्र सोनवने नाशिक आणि सुरज कदम सातारा हे चार युवक यात सहभागी आहेत. यातील राजेंद्र सोनवने हे व्यवसायिक असून बाकी तिघेजण महाविद्यालयात शिकत आहे.सायकल चालवणे ही कला आनंदासोबत शरीराला व्यायाम देते. तसेच पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या समर्थ बनविते. हे खरे असले तरी भारता सारख्या देशात सायकल मात्र क्रांती घडवून आणू शकते हे आता सिध्द झालेले आहे. आनंदाला मुकणारे असंख्य आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि तो अवयव दानातून. पण आपल्याकडे मात्र अजूनही अवयवदानाची कल्पना फारशी रूजली नाही. मेल्यावरही आपण जीवंत राहू शकतो. त्यासाठी करावे लागणार अवयवदान. ही संकल्पना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि पुण्यातील शनिवार वाड्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ केल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.दिवसाला ७० ते ९० कि.मी.चा प्रवास चारही जण करतात. शाळा, महाविद्यालय, चौक, देऊळ, चहा टपरी, उपहारगृह आणि रात्रीच्या मुक्काम स्थळी आम्ही लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. सायकल चालविणे, अवयवदानाचे महत्त्व, पर्यावरण आदीचे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार अधिक रूजावा यासाठी आमची धडपड असल्याचे चौघांनी सांगितले.ही यात्रा राळेगणसिध्दी, स्नेहालय, देवगड, औरंगाबाद, जालना, लोणार, वाशिम, कारंजा, यवतमाळ आणि रविवारला सायंकाळी वर्धेवरून सेवाग्राम येथे पोहचली.महात्मा गांधीजींच्या आश्रमात दर्शन घेऊन प्रेरणा घेतली. नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून कार्यास प्रोत्साहित केले. सोमवारला सकाळी बापूकुटीचे दर्शन घेऊन चारही सायकलस्वार आनंदवन च्या दिशेने रवाना झाले. चला माणूस म्हणून जगू या आणि जगू द्या हा संदेश ते लोकांपर्यंत पोहचविणार आहे. आनंदवन येथे याचा समारोप १९ नोव्हेंबरला होणार आहे.२० ते २२ नोंव्हेबरपर्यंत हेमलकसा येथे मुक्काम करून २३ रोजी नागपूरला आल्यानंतर बसने पुण्याला परतणार आहे. सायकल यात्रेचे दुसरे वर्ष आहे.जेष्ठ समाज सेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्वातून सदर कार्य सुरू आहे. आश्रमात मार्गदर्शिका संगिता चव्हाण यांनी सायकल स्वाराशी संवाद साधून त्यांना आश्रमची माहिती दिली.