अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:19 PM2018-11-19T22:19:07+5:302018-11-19T22:19:24+5:30

चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Organize propagation to organize organ movement | अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

Next
ठळक मुद्देचार युवकांचा पुढाकार : पुणे ते आनंदवन सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
किसन ताकमोडे अहमदनगर, गणेश नरसाळे सोलापूर, राजेंद्र सोनवने नाशिक आणि सुरज कदम सातारा हे चार युवक यात सहभागी आहेत. यातील राजेंद्र सोनवने हे व्यवसायिक असून बाकी तिघेजण महाविद्यालयात शिकत आहे.
सायकल चालवणे ही कला आनंदासोबत शरीराला व्यायाम देते. तसेच पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या समर्थ बनविते. हे खरे असले तरी भारता सारख्या देशात सायकल मात्र क्रांती घडवून आणू शकते हे आता सिध्द झालेले आहे. आनंदाला मुकणारे असंख्य आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि तो अवयव दानातून. पण आपल्याकडे मात्र अजूनही अवयवदानाची कल्पना फारशी रूजली नाही. मेल्यावरही आपण जीवंत राहू शकतो. त्यासाठी करावे लागणार अवयवदान. ही संकल्पना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि पुण्यातील शनिवार वाड्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ केल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.
दिवसाला ७० ते ९० कि.मी.चा प्रवास चारही जण करतात. शाळा, महाविद्यालय, चौक, देऊळ, चहा टपरी, उपहारगृह आणि रात्रीच्या मुक्काम स्थळी आम्ही लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. सायकल चालविणे, अवयवदानाचे महत्त्व, पर्यावरण आदीचे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार अधिक रूजावा यासाठी आमची धडपड असल्याचे चौघांनी सांगितले.
ही यात्रा राळेगणसिध्दी, स्नेहालय, देवगड, औरंगाबाद, जालना, लोणार, वाशिम, कारंजा, यवतमाळ आणि रविवारला सायंकाळी वर्धेवरून सेवाग्राम येथे पोहचली.
महात्मा गांधीजींच्या आश्रमात दर्शन घेऊन प्रेरणा घेतली. नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून कार्यास प्रोत्साहित केले. सोमवारला सकाळी बापूकुटीचे दर्शन घेऊन चारही सायकलस्वार आनंदवन च्या दिशेने रवाना झाले. चला माणूस म्हणून जगू या आणि जगू द्या हा संदेश ते लोकांपर्यंत पोहचविणार आहे. आनंदवन येथे याचा समारोप १९ नोव्हेंबरला होणार आहे.

२० ते २२ नोंव्हेबरपर्यंत हेमलकसा येथे मुक्काम करून २३ रोजी नागपूरला आल्यानंतर बसने पुण्याला परतणार आहे. सायकल यात्रेचे दुसरे वर्ष आहे.जेष्ठ समाज सेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्वातून सदर कार्य सुरू आहे. आश्रमात मार्गदर्शिका संगिता चव्हाण यांनी सायकल स्वाराशी संवाद साधून त्यांना आश्रमची माहिती दिली.

Web Title: Organize propagation to organize organ movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.