शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

वर्ध्यात ‘दोन’ तर आर्वीत ‘तीन’दा अपक्षांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला.

ठळक मुद्देमागोवा विधानसभेचा : काँग्रेसचाच राहिला वरचष्मा, यंदाही अपक्ष बाशिंग बांधूनच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला; पण जसजशी प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर सध्या वर्धा जिल्ह्यात पार पडणाऱ्या वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चार विधानसभेच्या जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी कामालाही लागले आहे. अनेक अपक्ष उमेदवार आमदारपदासाठी सध्या बाशिंग बांधून असून वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी दोनदा तर आर्वी मतदार संघातील मतदारांनी तीनवेळा अपक्ष उमेदवारांना बहुमताचा कौल दिल्याचे गत ५२ वर्षांचा इतिहास सांगतो.वर्धा आणि आर्वी विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिला आहे. मागील ५२ वर्षांत वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठ वेळा, तर आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार सात वेळा विजयी झाले. सध्या आर्वी काँग्रेसच्या तर वर्धा विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असले तरी या निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या व सीपीएमच्या एकदा मतदारांनी बहुमताचा कौल देत मुंबई दरबारी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने नंतर राकाँच्या घड्याळीची साथ धरली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी अन् युतीने आपला संसार वेगळा थाटला. त्यावेळी वर्ध्याचे आमदार म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राकाँत प्रवेश केलेल्या याच उमेदवाराने घड्याळ या चिन्हावर पुन्हा एकदा आपले राजकीय भविष्य अजमावले. परंतु, मतदारांनी मोदी लाटेवर स्वार होत भाजपच्या उमेदवाराला पसंती दिली. तर आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेसला सातवेळा, आयसीएस व भाजपला एक वेळा आणि अपक्ष उमेदवारांना तीनवेळा मतदारांनी बहुमताचा कौल दिला आहे. सध्या येथे काँगे्रसचा आमदार असून २००९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या उमेदवाराने धोबीपछाड दिली होती. त्यानंतर आता २०१९ ची ही सार्वत्रिक निवडणूक होत असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.वर्ध्यात विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्याला दिला अपक्षाने धोबीपछाडवर्धा विधानसभा क्षेत्रात १९७८, १९८० व १९८५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग विजय मिळविणाऱ्यां काँग्रेसच्या उमेदवाराला १९९० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने धोबीपछाडच दिली. परंतु, त्यानंतर याच काँग्रेसच्या उमेदवाराने पुन्हा १९९५, १९९९ व २००४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली.आमदारांना मिळतो प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधीराज्य सरकारकडून प्रत्येक आमदाराला प्रत्येक वर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटार, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी विकास आदी विकासकामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019