शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

गिट्टी क्रशर व खदान व्यावसायिकांकडून रॉयल्टी वाढीचा विरोध

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

येथील सर्व गिट्टी क्रशर व खदान व्यवसायिकांनी राज्य शासनाने केलेल्या रॉयल्टीच्या दुप्पट दरवाढीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांना निवेदन दिले.

एसडीओंना निवेदन : खाण बंदचा इशाराहिंगणघाट : येथील सर्व गिट्टी क्रशर व खदान व्यवसायिकांनी राज्य शासनाने केलेल्या रॉयल्टीच्या दुप्पट दरवाढीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांना निवेदन दिले. यातून त्यांनी हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील खाण उद्योग बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.राज्य शासनाने ११ मे २०१५ च्या अध्यादेशाद्वारा १०० क्युबीक फुट म्हणजे एक ब्रासवरील रॉयल्टी दुप्पट केली आहे. या व्यावसायिकांना आता २०० ऐवजी ४०० रुपये रॉयल्टी म्हणून भरावे लागत आहे. शासनाचा निर्णय व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारा असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. विदर्भातील स्टोन क्रशर व्यावसायिकांनी अस्तित्वात असलेली रॉयल्टी कमी करण्याचे शासनाला निवेदन दिले असताना रॉयल्टी कमी झालीच नाही, उलट दुप्पट तो वाढविण्याचा आरोप आहे.बांधकाम विकासात आवश्यक असलेल्य या घटकावरील रॉयल्टीत वाढ झाल्याने त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. शासनाच्या रॉयल्टी वाढीच्या फटक्यामुळे उद्योग बंद पडण्याचीही शक्यता या निवेदनाद्वारे वर्तविली आहे. या निवेदनात गौण खनिज खाण पट्ट्याचा कालावधी कमितकमी २० वर्षे करणे, ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र कायम स्वरूपी ठरविणे, तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रमाणपत्र कायम स्वरूपी लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदताना अभय मॅडमवार, सतीश वैद्य, यशवंत शिंदे, विनायक डेहणे, देवेंद्र नायडू, अनिल बजाज, कीर्ती सुराणा, शब्बीर खान, राजू निनावे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)