शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नागरी आरोग्य केंद्रांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:44 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत तयार करण्यात आली; पण वैद्यकीय अधिकारीच मिळत नसल्याने या इमारती शासनाचा पांढरा हत्ती ठरत होत्या.

ठळक मुद्देकस्तुरबा रुग्णालयाला हस्तांतरण : एप्रिल महिन्यात एक केंद्र होणार सुरू

ऑनलाईन लोकमतवर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत तयार करण्यात आली; पण वैद्यकीय अधिकारीच मिळत नसल्याने या इमारती शासनाचा पांढरा हत्ती ठरत होत्या. वर्धा न. प. प्रशासनाने त्यावर मात करीत या दोन्ही इमारती स्वस्थ शहराचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामला ओ.पी.डी. सुरू करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुलफैल येथील रुग्णालय सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून सुमारे सव्वा कोटींचा खर्च करून पुलफैल व सानेवाडी भागात नागरी आरोग्य केंद्राची इमारत तयार करण्यात आली. सानेवाडी येथील इमारतीपेक्षा पुलफैल भागातील इमारत सुसज्ज असून तेथे विविध सोयी-सुविधा आहेत. दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे मनुष्यबळ असावे यासाठी काही महिन्यांपूर्वी वर्धा न. प. प्रशासनाने पदभरती प्रक्रिया राबविली. त्यावेळी काही पदांसाठी मनुष्यबळ पालिकेला प्राप्त झाले. मात्र, अर्धवेळ किंवा पूर्णवेळसाठी एकही वैद्यकीय अधिकारी न. प. प्रशासनाला नागरी आरोग्य केंद्रासाठी मिळाला नाही. त्यानंतरही वारंवार संबंधितांकडे पालिकेने पाठपुरावा केला; पण पालिकेच्या पदरी एकही डॉक्टर पडला नाही. अखेर हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष बैठकीत चर्चीला गेला. तेव्हा त्यांनी पुढाकार घेत हा विषय मार्गी लावण्यासाठी वर्धा न. प. प्रशासनाला सहकार्य केल्याचे न. प. च्या एका अधिकाºयांने सांगितले. वर्धा न. प. च्या सभागृहात २६ मार्चला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सदर दोन्ही इमारती कस्तूरबा रुग्णालय सेवाग्रामला ओ. पी. डी. सुरू करण्यासाठी देण्याच्या विषयाला सभागृहाने मंजूरी दिली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुलफैल येथील नागरी आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याचे न. प. च्यावतीने सांगण्यात येत आहे.देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी नगर परिषदेकडेसेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय प्रशासन व वर्धा नगर परिषद प्रशासन यांच्यात नागरी आरोग्य केंद्रात ओ. पी. डी. सुरू करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या करारानुसार इमारतीची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी न.प.कडे देण्यात आली आहे. तर अर्धवेळ सेवा देणाºया डॉक्टराच्या वेतनाची व काही महत्त्वाची जबाबदारी कस्तुरबा रुग्णालयाच्या खांद्यावर टाकण्यात आली असल्याचे न.प. सूत्रांनी सांगितले.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पुलफैल व सानेवाडी येथे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम यांना ओ. पी. डी. सूरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालय व नगर परिषद प्रशासन यांच्यात करारही झाला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुलफैलातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. शिवाय त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.- अश्विनी वाघमळे,मुख्याधिकारी, न.प.वर्धा.कष्टकरी व गरजूंना अल्प दरात उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून न.प.ने हा निर्णय घेतला आहे. ‘रुग्णसेवा ही ईश्वर सेवा’ या हेतूने जिल्हाधिकाºयांनी व सेवाग्राम रुग्णालयातील काही अधिकाºयांनी न.प.ला सहकार्य केले. या आरोग्य केंद्रातून प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना मिळणार आहे. शिवाय कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी येथे सेवा देणार असल्याने याचा फायदा रुग्णांना होईल.- अतुल तराळे,नगराध्यक्ष, वर्धा.