शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

बसस्थानकासमोर खुलेआम दारूचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अ‍ॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देअश्लील शिवीगाळ : पोलिसांनी नेले दारूड्यांना पकडून

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील बसस्थानकासमोर गेल्या महिनाभरापासून खुलेआम गावठी व देशी दारूचे काऊंटर सुरू आहे. बेवड्यांच्या तर्रर्र नशेतील ताल पाहून काही व्यापाऱ्यांनी तक्रार केली असता त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली. शेवटी वातावरण तापल्यावर पोलिसांनी येवून दारूड्यांना पकडून नेल्यांचा प्रकार मंगळवारी घडला.खडकपूरा वॉर्ड बसस्थानकाच्या समोरच आहे. शिवाय दोन्ही बाजूला व्यापाऱ्यांची दुकाने आहे. याठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने पाच काऊंटर खुलेआम सुरू आहे. चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अ‍ॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांसमक्ष दारूविक्रेते व बेवड्यांची कहाणी कथन केल्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.त्यानंतर परसोडा, देलवाडी, लहान आर्वी, किन्ही व आष्टी येथील सात बेवड्यांनी लोटांगण घेत मोठा उपदव्याप केला. शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले. प्रचंड संख्येनी नागरिक गोळा झाले. ठाणेदार जितेंद्र चांदे, जमादार इंगोले यांनी गृहरक्षकांच्या मदतीने सर्व बेवड्यांना गाडीत भरून नेले. हा प्रकार सराईत सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सडकून टिका केली आहे. युवा पिढी दारूच्या आहारी गेल्याने तरूणी व महिलांच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस दररोज हप्ता वसुलीसाठी येतात. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना व्हिडीओ चित्रीकरण करून पुरावे पाठविण्यात आले आहे.चकन्याचे दुकान बंद कराबसस्थानक परिसरात पाच दुकानातून खुलेआम दारू विकतात. ती दुकाने तात्काळ बंद करा, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. शालेय मुलींनी नाकाला रूमाल लावून दुसरा रस्ता सुरू केला आहे. पोलीस मात्र उपाययोजना करीत नाही. त्यामुळे जनआंदोलनाचा भडका उडणार असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी