शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

‘धाम’ मध्ये केवळ ८.३८ दलघमी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:18 IST

पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देजलसंकट गडद : साडेतीन महिने पाणी वापरावे लागेल काटकसरीनेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी स्थानिक नगरपरिषेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने आणि जलाशयांमधील उपलब्ध पाण्याचे संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन नियोजन करण्यात आल्याने नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस लोटत गेले तसतसी जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने सध्या सहा दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. सध्यास्थितीत वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या धाम प्रकल्पात केवळ ८.३८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असल्याने नागरिकांनाही पुढील साडेतीन महिने पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, ३२८.६० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून जीवन प्राधिकरण वर्धा शहराच्या शेजारील ग्रामीण भागात तर नगर पालिका प्रशासन शहरी भागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करते. त्यामुळे धाम प्रकल्प हा वर्धा शहरासह शहराशेजारी असलेल्या सुमारे १५ गावांसाठी आधार देणाराच आहे. परंतु, मागील दोन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने हा प्रकल्प पूर्णत: भरला नाही. त्यामुळे यंदा कमालीच्या जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून पाटबंधारे विभागाकडून महिन्यातून केवळ एक वेळाच सदर जलाशयातील पाणी सोडले जात आहे. शिवाय पाण्याची उचल करणाऱ्या संस्थांना सदर विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना व गृहिणींना सहन करावा लागत आहे.मागील वर्षी होते २४.६५ दलघमी पाणीदिवसेंदिवस वाढत असलेली वर्धा शहर व शहराशेजारील लोकसंख्या तसेच त्यांची वाढणारी पाण्याची मागणी यामुळे भविष्यात उद्भवणारी जल समस्या लक्षात घेऊन धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचे वर्धा पाठबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने कागदोपत्री प्रक्रियाही सध्या केली जात आहे. परंतु, बड्या लोकप्रतिनिधींची उदासिनता व त्रुट्या शोधण्यात धन्यता मानत असलेल्या अधिकाऱ्यांमुळेच धाम प्रकल्पाची उंची मागील काही वर्षांपासून केवळ कागदावरच वाढत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात धाम प्रकल्पात २४.६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. परंतु, यंदा तो केवळ ८.३८ दलघमी असल्याने पाण्याचा काटकसरीनेच वापर गरजेचा आहे.रामनगरात होतोयपाण्याचा अपव्ययरामनगर परिसरातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महावीर बगीचात जलकुंभ आहे. परंतु, त्यापैकी एक जलकुंभातून सतत पाण्याची गळती होत आहे. सदर जलकुंभाची वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याने दररोज येथे शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.न.प.कडून टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरूसदर जलसंकटावर मात करण्यासाठी वर्धा न.प.ने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. सध्या पालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता यावा या अनुषंगाने काही खासगी टँकर अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवाय सदर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व्हावी यासाठीही अधिकाºयांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी