शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

महाडीबीटी पोर्टलवर केवळ 4 हजार 290 शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते.

ठळक मुद्देप्रभावी जनजागृतीचा अभाव : जिल्ह्यात एकूण २.४८ लाख शेतकरी

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच क्लिकवर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी तसेच विविध योजनेचा लाभ घेता यावा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. पण या पोर्टलबाबत प्रभावी जनजागृती करण्याकडे कृषी विभाग दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याने आतापर्यंत केवळ ४ हजार २९० शेतकऱ्यांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते. नोंदणी करताना शेतकऱ्याला केवळ आधार कार्ड आणि सातबारा तसेच आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

निवडीनंतर कागदपत्र गुरूवार ३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत असून त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयं घोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत हे विषेश.  

इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करावीजिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २०९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करावी.- अनिल इंगळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

या योजनांच्या लाभासाठी करता येताे ऑनलाईन अर्जएकाच क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरास मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदीची माहिती मिळत असून त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही सादर करता येतो. 

नोंदणी करणे सोपेचशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. नोंदणी करताना केवळ आधारकार्ड, सातबारा आणि आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी