शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात पोलिस महिलेच्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:22 IST

पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला.

ठळक मुद्देठोठावला तीन हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला. मनीष बाबूराव धोंगडे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.स्कुटीवर जाणाऱ्या शिपाई महिलेचा त्याने विनयभंग केला होता. त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली पीडिता २६ डिसेंबर २०१३ ला बहिणीच्या मुलासोबत दुचाकीने वर्धा येथून हिंगणघाटकडे येत होती. बहिणीचा मुलगा निखिल हा गाडी चालवत होता. सायंकाळी जामनी शिवारातुन जात असताना मागाहून येणाऱ्या दुचाकीचालकाने जवळ गाडी नेऊन तिचा विनयभंग केला होता. याप्रसंगी दोघांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमकही झाली होती. आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक नोंदवून घेतला होता. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुचाकी क्रमांकावरून मालकाचे नाव पीडितेने प्राप्त केले. २९ डिसेंबरला हिंगणघाट पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी मनीष बाबुराव धोंगडे व गौरव देवेंद्र मुडे रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट यांना अटक केली.सहायक पोलिस उपनीरिक्षक उमाकांत तळे यांनी तपास करून आरोपपत्र प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांच्या न्यायालयात सादर केले. चार साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Molestationविनयभंग