शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

एकाच रात्री पाच घरे फोडून ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:08 IST

एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला.

ठळक मुद्देगावात दहशत : चोरट्यांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. शिवाय पाचव्या घरातून दुचाकी पळविली. चोरीच्या या पाच घटना बुधवारी उघडकीस येताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री व पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार घरे फोडून मुद्देमाल व एक दुचाकी लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले हे येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांची बदली कारंजा (घा.) येथे झाल्याने त्यांनी खोलीतील सर्व साहित्य कारंजा येथे हलविले. याच बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. यामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. दुसरी चोरी दीपक वैरागडे यांच्या घरी झाली. ते वनविभाग तळेगाव येथे कार्यरत असून लग्न समारंभासाठी नातलगांकडे गेले आहे. त्यांच्याही घरावर चोरट्यांनी हात साफ केला. त्यांना दूरध्वनीवर चोरीची माहिती देण्यात आली. ते उपस्थित नसल्याने चोरीस गेलेला माल किती, हे कळू शकले नाही.तिसरी चोरी शेख लाजीर शेख नबी यांच्या घरी झाली. ते गवंडी काम करतात. घटनेच्या रात्री ते नागपूर येथे गेल्याचे कळते. त्यांच्या घरातून ६ ग्रॅम सोने व नगदी दोन हजार रुपये चोरीस गेल्याचा अंदाज आहे. चौथी चोरी लोहकरे यांच्या घरी झाली. त्यांच्या घराचे कुलूप तोडले; पण तेथे कुणीही राहत नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी चौकशी केल्यावर तेथे महिलेच्या जुतीचे ठसे व लहान मुलांच्या पायाचे ठसे आढळले. यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहे. पाचवी चोरी पटले यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या हुकूमचंद पालीवाल यांच्या घरी झाली. ते सि-डेट कंपनीत कार्यरत आहे. हुकूमचंद घरात झोपेत असताना घराबाहेर ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. घटनांची नोंद घेत पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा