सेलू: येथील नागपूर- वर्धा मार्गावरील कोटंबा पाटीजवळ दोन ट्रक समोरासमोर धडकले. या भीषण धडकेत ट्रकचा वाहक जागीच ठार झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. मुरली आसरोव वाकुडकर (२२) रा. टाटापूर (परभणी) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, ट्रक एम.एच.४० वाय ७१७७ हा नागपूर कडून वर्धेकडे येत होता. दरम्यान, वर्धेकडून नागपूरकडे जाणारा ट्रक एम.एच.३१ बी. १४१५ हा ट्रक त्या ट्रकवर आदळला. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यातील वर्धेकडे येणाऱ्या ट्रकचा क्लिनर मुरली आसरोव वाकुडकर जागीच ठार झाला. तर नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले. शेख अजिज शेख अखतार (२८), अनिल रमेश आनंदराव (२६) रा सुलतानपूर जि. बुलढाणा अशी त्यांची नावे असल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल असून घटनेचा तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
ट्रक अपघातात एक ठार
By admin | Updated: December 12, 2015 04:44 IST