शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Updated: September 14, 2015 02:07 IST

येथील महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला असून शनिवारी जखमीचा मृत्यू झाला.

महामार्गावरील घटना : आजंती येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू हिंगणघाट : येथील महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या इसमाचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला असून शनिवारी जखमीचा मृत्यू झाला. काशीराम श्रीवास (६१) रा. आजंती असे मृतकाचे नाव असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. ते हिंगणघाट येथून त्यांच्या आजंती येथील निवास्थानी जात असताना हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, काशीराम श्रीवास हे हिंगणघाट शहरातून आजंती येथे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील मोठा हनुमान मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या काशीनाथ यांना नागरिकांनी हिंगणघाटच्या खाजगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, पुतणे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ. समीर कुनावार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी) दुचाकी धडकल्याने एक गंभीर वर्धा : येथील आर्वी मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री घडली. जखमीचे नाव शैलेश पांडे असे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याा अपघातात आणखी जखमी झालेल्यांची नावे शहर पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती. शहर पोलीस रात्र गस्तीवर असताना आर्वी मार्गावरील दाते मंगल कार्यालयाजवळ अपघात झाला असून बघ्यांची गर्दी झाल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी जखमींना पहिले थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. यातील पांडे याच्या डोक्याला जबर मार असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एकाही जखमीच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात येत तक्रार केली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)