शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ४२ शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:09 IST

शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली.

ठळक मुद्देवनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी राबविला ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. याला नियमाप्रमाणे निकाली काढायला ४ महिन्याचा अवधी लागणार होता. मात्र त्यांनी प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबवित थेट गावातच दरबार भरविला.मोई येथे वन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले. गावातील एकापाठोपाठ ४२ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी दिल्या. वनविभागात तक्रारी येताच वनाधिकारी अमोल चौधरी यांनी वनरक्षक, वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक या सर्वांना सोबत घेवून मोई ग्रामपंचायतच्या आवारात दरबार भरविला. थेट सर्व शेतकºयांना बोलावून शेतातील नुकसानिची पाहणी करून पंचनाम तयार केले त्यावर सर्वांच्या सह्या झाल्या. आर्थिक नुकसान जागेवरच मंजुर केले. या आदर्श कार्यतत्पर कामामुळे मोईच्या सरपंच पद्मा कुसराम, उपसरपंच किसन चव्हान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वनाधिकारी चौधरी यांचे आभार मानले. एकूण ४२ प्रकरण मंजुरी करेपर्यंत किमान चार महिने कालावधी गेला असता. मात्र प्रशासन कार्यशील असले पाहिजे याची जाणीव चौधरी यांनी ठेवल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम तात्काळ मिळण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील मोई गाव जंगलाशेजारी आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.शेतीपिकांचे झालेले नुकसान दावे तात्काळ निघाली पाहिजे एवढाच उद्देश ठेवत प्रशासन आपल्या दारी उपक्रम राबविला.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग