शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस... दोन हत्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:04 IST

शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे.

ठळक मुद्देशहरातील आनंदनगरात गांजा विक्रेत्याला भोसकले : एकुर्लीत पत्नीचा आवळला गळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे. तर एकु र्ली येथील मृतक महिलेचे नाव कल्पना कैलास खोंड (३५) असे आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मिलिंद मेश्राम हा जुना गांजा विक्रेता होता. तो गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्याला विशाखापट्टनम् येथील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याने सुमारे १८ महिन्यांचा कारावास नुकताच भोगला होता. त्यानंतर वर्धेत परतलेल्या मिलिंदने सदर अवैध व्यवसायाला हात जोडत रेल्वे गाड्यांमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिलिंद हा त्याच्या घरी एकटा असल्याचे हेरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यातच तो जागीच गतप्राण झाला.आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह मिलिंदच्या घराशेजारी असलेल्या निर्माणाधिन घराच्या आवारात शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकून घटनास्थळावरून पळ काढला. सकाळी ही घटना निदर्शनास येताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने, पोलीस उपनिरीक्षक बोरखेडे, निलेश खेकारे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मिलिंदचा मृतदेह शौचालयाच्या टाक्याबाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सदर प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी चौकशीसाठी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.मृताच्या शरीरावर ३१ गंभीर जखमाअज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून मिलिंद मेश्राम याची हत्या केली. मृतक मिलिंद याच्या शरीरावर आरोपीने धारदार शस्त्राने चक्क ३१ वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आहे आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकुन दिला.अन् अल्पावधीतच घरातील रक्ताचा सडा स्वच्छघटनेच्यावेळी मिलिंद हा घरात एकटाच होता. याच आनंदनगर परिसरात मध्यरात्री २ वाजेपर्यंत वर्धा शहर पोलिसांची चमू गस्तीवर होती. त्यावेळीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही; पण सकाळी मिलिंद मेश्राम याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार केलेल्या टाक्यात फेकुन दिला. इतक्यावर तो थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने तब्बल ३१ वार केले रक्ताने माखलेले ते घर अल्पावधीतच स्वच्छ करून तेथून पोबारा केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.दोन दिवसांपूर्वी आला होता शहर पोलीस कचेरीतमृतक मिलिंद मेश्राम हा त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सोबत घेऊन त्याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सुमारे दोन दिवसांपूर्वी आला होता. परंतु, त्यावेळी काही कारणास्तव पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. त्यानंतर दोघेही घरी परतले. दरम्यान आज मिलिंदचा मृतदेह त्याच्या घराच्या आवारात आढळून आला.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा