देवळी पालिका : २८ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्पदेवळी : येथील न.प.च्यावतीने सन २०१६-१७ चा १ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. पालिकेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष शोभा तडस व मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्र्वानुमते संमत करण्यात आला. यात वर्षभराचे प्रस्तावीत उत्पन्न २८ कोटी ७८ लाख ५७ हजार ८६९, खर्च २७ कोटी ७६ लाख ६२ हजार १४३ तसेच सरतेशेवटी १ कोटी १ लाख ७२६ रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली. पालिका सभागृहात खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रपरिषदेमध्ये अर्थसंकल्पाची माहिती देण्यात आली. या अंदाजपत्रकात विकासाची अनेक दालने उघडण्यात आल्याचे नगराध्यक्ष शोभा तडस यांनी सांगितले. नमुद विकासकामे व त्यासाठी अपेक्षीत रकमेची आधीच तरतुद केल्यामुळे हा अर्थसंकल्प गत काही वर्षांतील विशेष ठरल्याचे यावेळेस त्या म्हणाल्या. प्रस्तावित विकासकामांमध्ये नगर परिषद प्रशासकीय इमारतीचा पहिला माळा व नाट्यगृह इमारतीचे बांधकामाकरिता ५ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. रस्ते अनुदानातून ४ कोटी ७ लक्ष रुपयांची कामे प्रगतिपथावर आहे. खासदार निधी अंतर्गत स्मशानभूमी विकास, रस्ते व शाळा बांधकाम तसेच शहराच्या मुख्य ठिकाणी हायमास्ट एलईडी लाईट लावण्याची कामे सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला २ कोटी २५ लाखाच्या खर्चातून ५६ दुकान गाळ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून साडेतीन कोटींच्या खर्चाच्या मैदान बांधकामाचा प्रस्ताव शासनाचे विचाराधीन आहे. स्वातंत्र्य सेनानी स्तंभाचे नूतनीकरण तसेच इंदिरा गांधी पुतळा, लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, तसेच शहीद अशोक गेडाम स्मारकाचे सौदर्यीकरण करण्याचे काम खासदार निधीतून होणार आहे. यासाठी शहर विकास आराखडा अद्यावत करण्यात आला असून स्मार्ट सीटीचे ध्येय आहे. यावेळी न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, सभापती विलास जोशी, राजेश बकाने, दिलीप कारोटकर, सारीका लाकडे, मंदा सातपुते, माजी नगराध्यक्ष प्रेमिला ढोक व मंदा भुजबळे, ज्योती इंगळे, माला लाडेकर, सुचिता मडावी, कृष्णकांत शेंडे, राहुल चोपडा उपस्थित होते.(प्रतिनिधी)एकलव्य आदिवासी योजनेचा प्रस्ताव आयुक्तालयात रमाई घरकुल योजनेंतर्गत ६३ लाभार्थ्यांना घरे बांधून दिली असून उर्वरित २०० लाभार्थी प्रस्तावित आहे. एकलव्य आदिवासी योजनेंतर्गत घरे बांधून देण्याचा प्रस्ताव अप्पर आयुक्तामार्फत म्हाडाकडे सादर करण्यात आला आहे. घर तिथे शौचालय योजनेंतर्गत १ हजार २०७ लाभार्थ्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी सीमेंट क्रॉक्रीटच्या नाल्याचे बांधकाम सुरू आहे. इंदिरानगर, न.प. ले-आऊट, केदार ले-आऊट मिरणनाथ ले-आऊट, तिवारी ले-आऊट, तसेच न.प. वाढीव हद्दीत प्राथमिक सुविधा तसेच रस्ते व नाल्यांचे बांधकाम व इतर विकासाची कामे सुरू आहे.शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठाभूमिगत गटाराचे बांधकाम येत्या वर्षात सुरू करण्यासोबतच येत्या उन्हाळ्यापर्यंत शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा मिळण्याचे दृष्टीने प्रयत्न आहे. मागेल त्याला घर देण्याच्या हेतूने दीनदयाल उपाध्याय घरकूल योजना तसेच वल्लभभाई पटेल घरकूल योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेतली जाणार आहे. सुंदर शहराचे निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे तसेच जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचे खा. तडस यांनी याप्रसंगी सांगितले.
एक कोटी शिलकीचे अंदाजपत्रक
By admin | Updated: February 24, 2016 02:07 IST